World Health Organization: 'भारतातील कप सिरप दर्जाहीन...,'जागतिक आरोग्य संघटनेने फटकारले

World Health Organization: आता जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील एका कप सिरपला दर्जाहीन म्हटले आहे.
World Health Organization
World Health OrganizationDainik Gomantak
Published on
Updated on

World Health Organization: जागतिक आरोग्य संघटना जगातील विविध आजार, विषाणू यांच्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे काम करत असते. याबरोबरच संसर्गजन्य आजार बळावू नयेत यासाठी काही ठोस उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्वेदेखील जागतिक आरोग्य संघटना जारी करत असते. आता जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील एका कप सिरपला दर्जाहीन म्हटले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने इराक मधील भारतीय कंपनीने तयार केलेल्या कप सिरफला दर्जाहीन म्हटले आहे. डब्ल्यूएचओने या कप सिरपच्या बॅचमध्ये डायथिलीन आणि एथिलीन ग्लाइकोल ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे.

भारतीय कंपनी डेबिलिउ फार्मा प्राइवेट लिमिटेडने बनवलेला हा कप सिरप असून जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे. सिरपच्या बॅचमध्ये मान्यतेपेक्षा जास्त डायथिलीन आणि इथिलीन ग्लायकोल असते.

इराकमधून कोल्ड आऊट सिरपचा नमुना प्राप्त झाला होता, त्याची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. या चाचणीत डायथिलीन ग्लायकॉल (0.25 पीसी) आणि इथिलीन ग्लायकॉल (2.1 पीसी) आढळून आले हे प्रमाण मान्यतेपेक्षा जास्त आहे.

इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकोल या दोन्हींची मर्यादा 0.10 टक्क्यांपर्यंत ठरवली गेली आहे. दरम्यान, निर्माता-विक्रेत्याने उत्पादनाच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबद्दल WHO ला हमी दिली नसल्याची माहीती समोर आली आहे.

World Health Organization
Dubai Airport: अन् विमान उड्डाण होण्यापूर्वी कार्गोतून बाहेर आले अस्वल, दुबई विमानतळावरील घटनेने प्रवाशांची धावपळ

सप्टेंबर 2022 मध्ये WHO ने म्हटले होते की मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या चार उत्पादनांची देखील चौकशी सुरू आहे. त्याच वेळी, डिसेंबर 2022 मध्ये, WHO ने बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन उत्पादनांबाबत अलर्ट जारी केला होता. आता जागतिक आरोग्य संघटना डेबिलिउ फार्मा प्राइवेट लिमिटेडच्या कंपनीच्या उत्पादनावर बंदी घालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com