महिलांचे कपडे बलात्कारसाठी जबाबदार; इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

emran khan 3.jpg
emran khan 3.jpg

पाकिस्तानमध्ये (Pakistan) लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांनी वाढत्या अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. यापूर्वी देखील इम्रान खान यांनी असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. 

पाकिस्तानमध्ये वाढत्या लैंगिक अत्याच्याराच्या घटनांमध्ये महिलांच्या कपड्यांशी संबंधित असल्याचे वांरवार सांगून पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीव्र टीका होत आहे. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले, ''जर एखाद्या महिलेने कमी कपडे घातले असतील तर त्याचा पुरुषांवर परिणाम होतो. त्या रोबोट असल्यास घटनांमध्ये हे घडणार नाही. केवळ ही शहाणपणाची बाब आहे.'' (Womens clothing responsible for rape Imran Khans controversial statement once again)

सोशल मिडियावर (social media) इम्रान खान (Imran Khan) यांच्या टीकेवर संताप व्यक्त केला जात आहे. पत्रकार आणि विरोधी नेते त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. दक्षिण आशियातील न्यायालयीन आयोगाच्या कायदेशीर सल्लागार रीमा ओमर (Reema Omar) यांनी ट्विट करत म्हटले की, ''पाकिस्तानतील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या काराणांबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा पिडितेला दोष देणे  हे अत्यंत अपमानास्पद विधान आहे.''

पंतप्रधानांचे डिजिटल माध्यमांवरील फोकस पर्सन डॉ. अरसलन खालिद (Arsalan Khalid) यांनी म्हटले, ''इम्रान खांनी केलेल्या विधानाचे संदर्भासहित सोशल मिडियावर ट्विट केले जात आहेत. त्यांच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढला जात आहे. ते आपण कोणत्या प्रकारच्या समाजामध्ये राहत आहोत आणि समाजातील लैंगिक निराशेबद्दल आपले मत व्यक्त केले होते.''

इम्रान खान यांनी याआगोदर पाकिस्तानमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणाऱ्या अश्लीलतेला दोष दिला होता. इम्रान खान यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते, ''पडद्याची संपूर्ण संकल्पना ही प्रलोभन टाळण्यासाठी आहे. सर्वांनी ते टाळण्याची इच्छा नसते.''

लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांच्या सरकारने घेतलेल्या पाऊलांबद्दल एका प्रश्नाला उत्तर देताना इम्रान खान देत होते. एप्रिलमध्ये इम्रान खान यांच्या टीकेनंतर शेकडो लोकांनी त्यांनी माफी मागावी म्हणून निवेदनावर स्वाक्षरी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com