ओ माय गॉड टुरु लब....राजकुमारीने प्रियकरासाठी 2500 कोटींवर सोडले पाणी

Malaysian Princess Angeline Francis: प्रेम कहाण्या रोमांचित करतात. परंतु दरम्यानच्या काळात असे प्रकरण समोर आले आहे, ज्याबद्दल जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल.
Malaysian Princess Angeline Francis
Malaysian Princess Angeline FrancisDainik Gomantak
Published on
Updated on

Malaysian Princess Angeline Francis Rejected Rs 2500 Crore For Love: प्रेम कहाण्या रोमांचित करतात. परंतु दरम्यानच्या काळात असे प्रकरण समोर आले आहे, ज्याबद्दल जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल.

वास्तविक, एका श्रीमंत मुलीने तिच्या प्रेमासाठी 300 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 2500 कोटी रुपयांवर लाथ मारली. यानंतर तिने तिच्या प्रियकराशी लग्न केले.

2500 कोटी गमावल्यानंतर प्रेम मिळाले

दरम्यान, ही मुलगी मलेशियन उत्तराधिकारणी अँजेलिन फ्रान्सिस आहे, जिने 2500 कोटी रुपये सोडून आपल्या प्रेमाला प्राधान्य दिले. याबद्दल जाणून काही लोकांना आश्चर्य वाटले.

काहींना असा प्रश्न पडला की, प्रेम खरंच आंधळं असतं का? तर काही लोक याला तरुणाईचा उत्साह म्हणत आहेत. एकंदरीत हे खरे आहे की, अँजेलिन फ्रान्सिसने प्रियकरासाठी 2500 कोटी रुपये गमावले.

Malaysian Princess Angeline Francis
"चीनपासून 'स्वातंत्र्य' मिळवण्यासाठी भक्कम भारत-अमेरिका संबंधांची गरज," अमेरिकन नेत्याची मोदींना साद

शिक्षण घेत असताना प्रेमात पडले

बिझनेस मॅग्नेट खू के पेंग आणि माजी मिस मलेशिया पॉलीन चाय यांच्या पोटी जन्मलेली अँजेलिना ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असताना प्रेमात पडली.

मलेशियातील (Malaysia) बिझनेस टायकूनची मुलगी अँजेलिन फ्रान्सिस आणि जेदिदिया फ्रान्सिस यांचे प्रेम इतके वाढले होते की, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अशाप्रकारे अँजेलिनाने जेदिदियासोबत लग्न करण्यासाठी वडिलांची 2500 कोटींच्या संपत्तीवर पाणी सो़डले.

दुसरीकडे, अँजेलिनच्या वडिलांनी 300 मिलियन डॉलर म्हणजेच 2500 कोटी रुपयांची मोठी संपत्ती अँजेलिनच्या नावावर ठेवली होती.

घरच्यांच्या मर्जीनुसार लग्न करावे लागेल, अशी अट होती. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असताना अँजेलिन आणि जेदिया यांची भेट झाली. काही काळानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

Malaysian Princess Angeline Francis
'भारत-अमेरिका चांगले मित्र', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने का टवकारले अनेकांचे कान?

लग्नाला 30 पाहुणे उपस्थित होते

तसेच, कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी संपत्ती किंवा प्रियकर निवड, असे स्पष्टपणे सांगितले. 2008 मध्ये अँजेलिना जेदिदियाला भेटली होती. जेदिदिया कॅरिबियन असून डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतो.

केंब्रिजच्या चर्च ऑफ पेम्ब्रोक कॉलेजमध्ये दोघांचे लग्न झाले. दोघांच्या लग्नात फक्त 2700 डॉलर खर्च एकढा खर्च आला. त्यांच्या या लग्न (Marriage) सोहळ्याल अवघ्या 30 पाहुण्यांनी हजेरी लावली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अँजेलिनचे आई-वडील त्यांच्या लग्नला उपस्थित राहिले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com