भारतासोबत युद्ध झाल्यास सौदी पाकिस्तानला मदत करणार का? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने काय उत्तर दिलं पाहा Video

India Pakistan: सौदी आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याविरोधात संरक्षण पुरवण्याबाबत हा करार करण्यात आला आहे.
Saudi Pakistan defence pact
Khawaja Asif statement on India warDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानने अलिकडेच सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला आहे. इस्लामाबाद आणि रियाद यांच्यातील या करारानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी यावर भाष्य केले. भारतासोबत युद्ध झाल्यास सौदीचे सैन्य पाकिस्तानला मदत करेल, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.

संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले. भारत आणि पाकिस्तान युद्ध झाल्यास सौदी पाकिस्तानला मदत करणार का?, असा प्रश्न पत्रकाराने आसिफला केला. यावर आसिफ यांनी ‘नक्कीच मदत करतील याबाबत अजिबात शंका नाही’, असे उत्तर दिले. करार सहकार्याच्या दृष्टीनेच करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

Saudi Pakistan defence pact
Sudan Drone Attack: सुदानमध्ये क्रूरतेचा कळस! अल-फाशर येथील मशिदीवर ड्रोन हल्ला; 75 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

पाकिस्तान किंवा सौदी अरेबियावर कोणत्याही देशाने हल्ला केला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला समजला जाईल आणि त्याला एकत्रितपणे उत्तर दिले जाईल, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.  पहलगाम येथे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना अंदाधुंद गोळीबार करत २५ भारतीय आणि ०१ नेपाळी नागरिकाला ठार केले. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यात भारताने पाकिस्तानमधील ०९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते.

पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत या आठवड्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याविरोधात संरक्षण पुरवण्याबाबत हा करार करण्यात आला आहे. उपपंतप्रधान इशाक दार यांनी या करारानंतर इतर देशही याप्रकारच्या करारात सहभागी होण्यास तयार असल्याचे मत मांडले आहे.

Saudi Pakistan defence pact
First AI Minister: जगातील पहिली एआय मंत्री, संसदेत केले भाषण; भ्रष्टाचाराला चाप बसविण्यासाठी अल्बानियात टेक प्रयोग Watch Video

दरम्यान, भारताने पाकिस्तान आणि सौदी यांच्यातील कराराचा व्यवस्थित समजून त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवर कसा परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

या करारबाबत अगोदरपासून हालचाली सुरु असल्याची कल्पना होती. कराराचा व्यवस्थित अभ्यास केला जाईल. भारत नागरिकांची आणि सीमेची सुरक्षा करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सरकारी अधिकारी रणधीर जैस्वाल एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com