पाकिस्तानची लाचारी, कर्ज फेडण्यासाठी ड्रॅगनला देणार 'गिलगिट-बाल्टिस्तान'?

वाढत्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान गिलगिट बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीर प्रदेश चीनला भाडेतत्त्वावर देऊ शकतो असे म्हटले जात आहे.
Gilgit Baltistan
Gilgit BaltistanDainik Gomantak

वाढत्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान गिलगिट बाल्टिस्तान (GB), पाकव्याप्त काश्मीर प्रदेश (PoK) चीनला भाडेतत्त्वावर देऊ शकतो असे म्हटले जात आहे. काराकोरम नॅशनल मूव्हमेंटचे अध्यक्ष, मुमताज नागरी यांनीही याबाबतची भीती व्यक्त केली आणि त्यावेळी ते म्हणाले की, गिलगिट बाल्टिस्तान भविष्यातील युद्धभूमी बनू शकते. (Will Pakistan give Gilgit Baltistan share to China due to increase in debt)

Gilgit Baltistan
भारताने UN मध्ये पाकिस्तानला केले लक्ष्य, दहशतवादी संघटनांवर कारवाईची मागणी

काश्मीरचा उत्तरेकडील भाग हा चीन आणि नागरीच्या सीमेला लागून आहे, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे की पाकिस्तान जीबी चीनला दिला जाऊ शकतो. संपूर्ण पाकिस्तानी सरकार आणि लष्करी नियंत्रण असूनही पाकिस्तानला असे पाऊल उचलणे सोपे जाणार नाहीये, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान हे पाऊल उचलू शकेल का?

गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशावर पाकिस्तानने अवैध कब्जा केला आहे. पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या ताब्यात दिल्यास ड्रॅगनसाठी ते वरदान ठरेल, असे जाणकारांनी म्हटले आहे. सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी या निर्णयामुळे इस्लामाबादला मोठी रक्कम मिळू शकते असेही अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेची नजर चीनवर

आशियातील चीनचा विस्तार रोखण्यासाठी अमेरिका पावले उचलत असून, चीनच्या ताब्यात कोणताही नवा भूभाग गेलेला अमेरिका कदापी सहन करणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकाच बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानसारख्या भागांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत आहे. गिलगिट-बाल्टिस्तान भारतात असते आणि बलुचिस्तान स्वतंत्र असते, तर अफगाणिस्तानात अमेरिकेची ही स्थिती झाली नसती, असे अमेरिकन काँग्रेसशी संबंधित बॉब लान्सिया यांनी मत व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com