भारताला लस निर्मितीसाठी सक्षम करणार: जो बायडन

जी 7 च्या बैठकीतही अमेरिकेने (America) जगाला 500 दशलक्ष लस डोस देण्याचे आश्वासन दिले होते.
America President Joe Biden
America President Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचं संकट (Covid 19) अधिक गडद होत असताना दुसरीकडे अमेरिकेचे (America) अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी म्हटले आहे की, ते भारत आणि इतर देशांना कोविड -19 लस तयार करण्यास सक्षम बनवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये पारक पडलेल्या एका पत्रकार परिषदेत बायडन म्हणाले की, जगात लसींच्या अनेक अब्ज डोसची आवश्यकता आहे आणि अमेरिका सुमारे अर्धा अब्ज (500 दशलक्ष) डोस देण्यासाठी वचनबद्ध आहे. जी 7 च्या बैठकीतही अमेरिकेने जगाला 500 दशलक्ष लस डोस देण्याचे आश्वासन दिले होते.

America President Joe Biden
Covid19: चीनच्या लॅबमधूनच कोरोना लिक! US रिपब्लिकनचा अहवाल

जो बायडन एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, 'आम्ही लसींचे अब्जावधी डोस देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही भारतासारख्या देशांना लस तयार करण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहोत…. आम्ही त्यांना या कामात मदत करत आहोत. यावेळी आम्ही हेच करत आहोत. 'ते म्हणाले,' आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यासाठी कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत. आम्ही शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहोत. बायडन पुढे म्हणाले की, कोरोना महामारीविरुध्द लढण्यासाठी अमेरिका लसींचा साठा करण्यास तयार आहे.

America President Joe Biden
"भ्रमात राहू नका कोरोना संपलेला नाही" Who च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा

Kovax चं सर्वाधिक योगदान

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, 'आम्ही बांधिलकी निभावण्यासाठी तयार आहोत. जगभरात कोविड -19 लस वितरित करण्याच्या सामूहिक जागतिक प्रयत्नांसाठी सुरू केलेल्या 'कोव्हॅक्स' उपक्रमामध्ये आम्ही इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त योगदान दिले आहे. आम्ही जपान, भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यासह आमच्या क्वाड भागीदारीद्वारे इतर देशांमध्ये लस निर्मितीच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. करोडो डोस खरेदी करु आणि सुमारे शंभर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना दान करु. हे डोस महिन्याच्या अखेरीस पाठविण्यास सुरू होतील.

America President Joe Biden
कोरोनाचे 'सुपर म्युटंट व्हेरिएंट' येऊ शकतो, ब्रिटिश शास्त्रज्ञांचा इशारा

कोरोनामुळे जगभरात 42.5 लाख लोकांचा मृत्यू झाला

बायडन म्हणाले, 'आम्ही आमचे 80 दशलक्ष डोस जगाला दान करण्याची घोषणा केली होती, ज्याचे वाटपही सुरू झाले आहे आणि संक्रमणामुळे 42.5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात कोविड -19 ची 3,17,69,132 केसेसची नोंद झाली आहे. आणि कोरोना संक्रमणामुळे 4,25,757 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसचा सामना करण्यासाठी लोकांमध्ये जलद लसीकरण देखील केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com