Russia Vs Ukraine: पुतीन नव्हे, हे तर 'लूटिन'? रशियाच्या सैनिकांकडून इतिहासातील सर्वात मोठी लूट

युक्रेनच्या खेरसन भागातून पळ काढताना लुटला अमुल्य ठेवा
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

Kherson Art Museum Paintings Theft: नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट काय होईल, हे सध्या कुणीच सांगू शकत नाहीय. त्यातच आता रशियाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. रशियाच्या लष्कराने युक्रेनच्या खेरसन भागातून माघार घेताना इतिहासातील सर्वात मोठी लूट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना आता माध्यमांमध्ये 'लुटिन' असे संबोधले जात आहे.

युक्रेनमधील खेरसन येथील कला संग्रहालयाच्या (Kherson Art Museum) संचालक अलिन डोटसेन्को यांनी युद्धाला सुरवात झाल्यानंतर या संग्रहालयातील बहुमुल्य किंमतींचा चित्रांचा, वस्तुंचा ठेवा म्युझियमच्या तळघरातील कपाटांमध्ये सुरक्षितरित्या लपवून ठेवला होता. पण रशियन सैनिकांना याची कुणकुण लागली. रशियन लष्कराने हा भाग सोडताना या संग्रहातील एकुण 14 हजार अमुल्य चित्रे चोरून नेली. 72 वर्षीय संचालक अलिना डॉट्सेन्को (Alina Dotsenko) यांच्या हवाल्याने ब्रिटनमधील माध्यमांनी हे वृत्त छापले आहे.

द सन या नियतकालिकाने लिहिले आहे की, रशियन सैनिकांनी केलेली ही लूट इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी एक आहे. या महिन्यात खेरसनमधून पळ काढण्याआधी रशियन सैनिक येथील कला संग्रहालयात गेले. त्यांनी तेथील चित्रांचा अमुल्य ठेवा ट्रकमध्ये भरून रशियात नेला. युद्ध गुन्ह्याचा तपास करणाऱ्यांनी म्हटले आहे की, या संग्रहालयातून चोरी झालेल्या सुमारे 14 हजार हून अधिक अमुल्य चित्रे, वस्तु यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

अलिना डॉटन्सेको म्हणाल्या की, संग्रहालयात रिकाम्या खोल्या पाहून मी चाटच पडले. मला अक्षरशः रडू आले. आमच्याकडे 14 हजार एकाहुन एक अमुल्य अशी चित्रे होती. हे संग्रहालयक युक्रेनमधील सर्वात मोठे कलासंग्रहालय आहे. येथे इंग्लंड, स्पेन, हॉलंड आणि संपुर्ण युरोपमधील महत्वाची चित्रे होती. त्याच्या किंमतीचा अंदाज लावता येऊ शकत नाही. हीच चित्रे चोरीला गेली आहेत. हा आमच्या संस्कृतीवर घातलेला दरोडा आहे.

Vladimir Putin
Four Day Working Week: यूकेतील 100 कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा केला लागू!

त्या म्हणाल्या, शस्त्रधारी लोक म्युझियममध्ये आले. तीन पोलिस आणि तीन एफएसबी या रशियन गुप्तचर संस्थेचे होते. 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात ही चोरी झाली आहे. ही चित्रे ट्रकमध्ये भरून क्रिमिया येथील सिंफेरोपोल येथे नेण्यात आली आहेत. चोरी झालेल्या चित्रांमध्ये किंग्ज चार्ल्स द्वितीय यांच्या दरबारातील मुख्य चित्रकार अँग्लो डच मास्टर सर पीटर लेली यांच्या सुप्रसिद्ध 'लेडी विद डॉग' नावाच्या 17 व्या शतकातील चित्राचाही समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com