Geert Wilders: कोण आहेत गीर्ट वाइल्डर्स? होऊ शकतात नेदरलँड्सचे PM; नुपूर शर्माला दिला होता पाठिंबा

Netherlands Prime Minister: अर्जेंटिनानंतर नेदरलँड्सला नवा पंतप्रधान मिळणार आहे.
Geert Wilders Would Be Netherlands Prime Minister
Geert Wilders Would Be Netherlands Prime MinisterDainik Gomantak
Published on
Updated on

Geert Wilders Would Be Netherlands Prime Minister: अर्जेंटिनानंतर नेदरलँड्सला नवा पंतप्रधान मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार उजव्या विचारसरणीचे नेते गीर्ट वाइल्डर्स नेदरलँड्सचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात. वाइल्डर्स पार्टी फॉर फ्रीडम (PVV) सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो.

पक्षाला 150 पैकी 50 जागा मिळण्याचा दावा केला जात आहे. यानंतर लेबर-ग्रीन युती 25 जागा जिंकू शकते. पार्टी फॉर फ्रीडम (PVV) ला 2021 च्या निवडणुकीत 16 जागा मिळाल्या, परंतु यावेळी पक्ष बहुमताने जिंकू शकतो आणि वाइल्डर्स देशाचे नवीन पंतप्रधान होऊ शकतात.

राजकीय विश्लेषक ते पॉप्युलर होण्यामागचे श्रेय इस्लाम आणि युरोपीय युनियनविरोधात निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यांना देत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गीर्ट वाइल्डर्स यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्या नुपूर शर्माचेही समर्थन केले होते, ज्यामुळे त्यांच्यावरही टीका झाली होती. हिजाब घालणे बेकायदेशीर ठरवणे, मशिदी बंद करणे आणि कुराणवर बंदी घालण्याचे त्यांनी समर्थन केले होते. ते इस्लामला तसेच युरोपियन युनियनला विरोध करतात.

नुपूर शर्माचे समर्थन करताना ते म्हणाले होते की, 'मी भारताला आवाहन करणार आहे. भारताने कट्टरतावादी मुस्लिम देशांच्या दबावाखाली येऊ नये.' नुपूर शर्माच्या वक्तव्यावर इस्लामिक देशांनी नाराजी व्यक्त केली होती. ट्विट करत त्यांनी मोदी सरकारला (Modi Government) बचावात्मक पवित्रा न घेण्याचे आवाहनही केले होते.

Geert Wilders Would Be Netherlands Prime Minister
चीनच्या साथीने पाकिस्तानने खेळला मोठा डाव! 'या' मोठ्या समूहाच्या सदस्यत्वासाठी केला अर्ज

कोण आहेत गीर्ट वाइल्डर्स?

गीर्ट वाइल्डर्स यांचा जन्म 1963 मध्ये नेदरलँड्समधील वीनलो या छोट्याशा शहरातील रोमन कॅथोलिक कुटुंबात झाला. वडील एका प्रिंटिंग कंपनीत मॅनेजर होते तर आई गृहिणी होती. मुक्त विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. विमा कंपनीतही त्यांनी काही दिवस काम केले. ते इस्रायलमध्ये 2 वर्षे राहिले, यादरम्यान त्यांनी अरब देशांनाही भेट दिली. ते त्यांच्या कट्टर विचारांसाठी ओळखले जातात.

1997 मध्ये, त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि लिबरल पीपल्स पार्टी फॉर फ्रीडम अँड डेमोक्रसीमध्ये सामील झाले आणि रिप्रेजेंटेटिव्स मेंबर म्हणून निवडून आले. 1998 मध्ये ते पहिल्यांदा नेदरलँड्सच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य बनले, परंतु इस्लाम आणि युरोपियन युनियनच्या विरोधात असल्याने त्यांनी पक्षापासून फारकत घेतली.

2004 मध्ये युरोपियन युनियनमध्ये तुर्कीच्या समावेशावरुन त्यांचा पक्षाशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये स्वतःचा पक्ष, पार्टी फॉर फ्रीडम (PVV) स्थापन केला. विशेष म्हणजे, त्यांच्या पक्षाने 9 जागा जिंकून संसदीय निवडणुकीत (Election) आपली उपस्थिती नोंदवली.

Geert Wilders Would Be Netherlands Prime Minister
Argentina New President: 'बलात्कारानंतरही अबॉर्शन करणे पाप,' जाणून घ्या कोण आहेत अर्जेंटीनाचे नवे राष्ट्रपती

गीर्ट वाइल्डर्स यांच्या वक्तव्यांवरुन वादंग

दरम्यान, गीर्ट वाइल्डर्स यांचे राजकारण आणि मोहिमा इस्लामविरोधी आहेत. ते युरोपियन युनियनच्या विरोधात आहे. इमिग्रेशनच्या विरोधात आहेत. त्यांना नेदरलँड्सचे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. नेदरलँड्सच्या सध्याच्या सरकारवर देशाचे इस्लामीकरण केल्याचा आरोप ते करत आहेत. त्यांनी पवित्र कुराणवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, 2021 मध्ये त्यांनी 'मार्क्ड फॉर डेथ: इस्लाम्स वॉर अगेन्स्ट द वेस्ट अँड मी' नावाचे पुस्तक लिहिले. ते म्हणाले होते की, ते मुस्लिमांचा द्वेष करत नसून त्यांच्या पुस्तक आणि विचारसरणीला विरोध आहे. गीर्ट यांनी 2008 मध्ये 'फितना' नावाचा चित्रपट बनवला होता, ज्यामध्ये दहशतवादी घटना कुराणशी जोडल्या होत्या. त्यावरुनही वाद निर्माण झाला होता.

गीर्ट यांच्यावर न्यायालयात खटलाही चालवण्यात आला होता. 2009 मध्ये ब्रिटनने त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. 2014 मध्ये, गीर्ट यांच्यावर पुन्हा एकदा द्वेष पसरवण्याचा आरोप झाला आणि खटला चालला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com