World Health Organization: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने नुकताच एक चिंताजनक आणि धक्कादायक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये जगभरातील महिला आणि पुरुषांच्या इनफर्टिलिटी रेटबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
या अहवालात म्हटले आहे की, जगातील प्रत्येक सहावी महिला किंवा सहावा पुरुष इनफर्टिलिटीच्या आजाराने ग्रस्त आहेत.
WHO च्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील 17.5 टक्के लोक इनफर्टिलिटीच्या आजाराने ग्रस्त आहे, परंतु सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे विकसित देशांमध्ये म्हणजेच श्रीमंत देशांमध्ये हा आकडा 17.8 टक्के आहे, तर गरीब देशांमध्ये हा आकडा 16.5 टक्के आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, गर्भनिरोधक गोळ्या न घेता एक वर्षानंतरही एखादी महिला (Women) गर्भधारणा करु शकली नाही, तर ती इनफर्टिलिटीच्या आजाराची शिकार मानली जाते.
WHO ने जारी केलेल्या अहवालात (Report) सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 1990 ते 2021 पर्यंत एकूण 133 स्टडीज वाचून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
त्यापैकी 66 स्टडीज पती-पत्नीवर होते, तर 53 स्टडीज अशा लोकांवर करण्यात आले जे अद्याप विवाहित नाहीत आणि आपल्या जोडीदारासोबत लिव्ह-इनमध्ये राहतात. यासोबतच अशा 11 लोकांना या अभ्यासात समाविष्ट करण्यात आले होते, ज्यांचे मॅरिटल स्टेटस सांगितले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.