Corona विरुद्ध लढण्यात जगाला भारताची मदत, अमेरिकेकडून भारताचे कौतुक

White House On India: अमेरिकेने भारताचे कौतुक करत म्हटले की, भारत हा संपूर्ण जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे.
Corona
Corona Dainik Gomantak
Published on
Updated on

जगात कोरोना लसींचा (Corona Vaccine) पुरवठा करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे, असं म्हणत अमेरिकेने (America) भारताचे कौतुक केले आहे. व्हाईट हाऊसने म्हटले की, भारत हा जगासाठी लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे. जागतिक स्तरावर कोरोना लसींचा पुरवठा करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे. व्हाईट हाऊसने जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लढण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य करत भारताचं कौतुक केलं आहे.

व्हाईट हाऊसने म्हटले की, जागतिक स्तरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा (Coronavirus Vaccine) साठा पुरवठा करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्हाईट हाऊसचे कोरोना विषाणू रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना पत्रकारांना ही प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. झा यांनी म्हटलं की, 'भारत हा जगासाठी कोरोना लसींचा एक महत्त्वाचा उत्पादक आहे. जागतिक स्तरावर कोरोना (Corona) लसींचा पुरवठा करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या मोठ्या उत्पादन क्षमतेमुळे भारत जागतिक पातळीवर कोरोना लसींचा प्रमुख निर्यातदार ठरला आहे.

दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. झा यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांच्यातील क्वाड भागीदारी हा एका धोरणात्मक सुरक्षा संवाद संवाद आहे. मंगळवारी पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत, व्हाईट हाऊसचे (White House) कोरोना व्हायरस रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी म्हटलं की, भारताच्या मोठ्या उत्पादन क्षमतेमुळे भारत जगभरातील कोरोना लसींचा मोठा निर्यातदार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com