डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार प्रकरण काय? अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच चालणार असा खटला

पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीची तयारी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Donald Trump and Stormy Daniels scandal
Donald Trump and Stormy Daniels scandalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Donald Trump and Stormy Daniels scandal: अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षाला गुन्हेगारी खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांना महाभियोगाचा सामना करावा लागला आहे.

अमेरिकेतील मॅनहॅटन शहरातील ज्युरी मंडळाने गुरुवारी ट्रम्प यांना 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान पॉर्न स्टारला पैसे दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे. शिवाय, ग्रँड ज्युरीने त्यांना दोषी ठरवण्यासाठी मतदान देखील केले.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अमेरिकेतील ग्रँड ज्युरीने गुरुवारी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आणि पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याच्या बाजूने मतदान केले.

पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीची तयारी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुन्हेगारी खटल्याच्या कारवाईदरम्यान निवडणूक प्रचार सुरू ठेवणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण जाईल.

न्यूयॉर्क ज्युरीच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना अटलांटा आणि वॉशिंग्टनमध्ये चौकशीलाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार डोनाल्ड यांच्यासमोर पक्षाचा चेहरा म्हणून पुढे जाण्याची शक्यता संपुष्टात येणार आहे.

Donald Trump and Stormy Daniels scandal
Pakistan Video: पाकिस्तानमध्ये हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या, ‘टार्गेट किलिंग’चा संशय

कायदेशीर प्रकरणात अडकलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या पक्षातील इतर उमेदवारांशी स्पर्धा करणेही कठीण होणार आहे. गेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर कॅपिटल हिलवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या गदारोळाचे प्रकरणही यादरम्यान समोर येऊ शकते.

काय आहे डोनाल्ड ट्रम्प आणि स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरण?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न चित्रपट अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्ससोबत संबंध असल्याचा आरोप आहे. स्टॉर्मी डॅनियल्सने स्वतः दावा केला होता की, दोघांमध्ये शारीरिक संबंध होते. दोघांमध्ये बराच काळ संबंधही होते.

ट्रम्प यांनी त्यांच्या वकिलामार्फत प्रेमप्रकरणाचा हा दावा फेटाळला असला तरी. यानंतर, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की डोनाल्ड ट्रम्पच्या वकिलाने प्रौढ स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला याबद्दल तोंड बंद ठेवण्यासाठी 1 लाख 3000 डॉलर म्हणजेच सुमारे 80 लाख रुपये दिले होते.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, स्टॉर्मी डॅनियलने 2016 मध्ये एबीसी न्यूजसोबत त्याच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधाबद्दल बोलायला सुरुवात केली.

17 मार्च 1979 रोजी अमेरिकेत जन्मलेल्या स्टॉर्मी डॅनियल्सचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. तिला स्टॉर्मी वॉटर्स या नावानेही ओळखले जाते. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार स्टॉर्मी डॅनियल्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांची 2006 मध्ये एका गोल्फ टूर्नामेंटदरम्यान भेट झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Sanctions On International Criminal Court
Donald Trump Statement on France Protest
Donald Trump Claims Iran Behind Plane Attack
US Iran talks three hour meeting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com