दारू न पिताही हा माणूस होतो 'टल्ली'... शरीरात आपोआप तयार होतं अल्कोहोल; काय आहे प्रकार?

या प्रकारच्या आजाराचे निदान पहिल्यांदा जपानमध्ये 1952 मध्ये करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा आतड्यातील विशिष्ट प्रकारच्या बुरशीची वाढ कर्बोदकांना अल्कोहोलमध्ये रूपांतरित करते.
Auto-brewery syndrome
Auto-brewery syndromeDainik Gomantak

जगभरात रोज विविध घटना घडत असतात त्यामध्ये अशाही काही गोष्टी असतात ज्या पाहून, वाचून आपण चक्रावून जातो.

आता अशीच एक घटना बेल्जियममधून समोर आली आहे. जेथे दारू पिऊन गाडी चालवल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.

पण तपासणीनंतर असे आढळले की, त्या व्यक्तीच्या शरीरात आपोआपच अल्कोहोल तयार होत होते. वास्तविक ती व्यक्ती ऑटो-ब्रेव्हरी सिंड्रोम (ABS) या आजाराने ग्रस्त होती, हा एक दुर्मिळ आजार आहे ज्यामुळे शरीरात अल्कोहोल तयार होते.

एप्रिल 2022 मध्ये रोजी बेल्जियमच्या ब्रुग्समधील एका ४० वर्षीय व्यक्तीला मद्यपान करून वाहन चालवल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले, कारण त्याच्या वकिलांनी त्याला ऑटो-ब्रुअरी सिंड्रोम (ABC) ग्रस्त असल्याचे सिद्ध केले.

या व्यक्तीवर जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा त्याच्या शरीरात अल्कोहोलची पातळी 0.91 होती, जी मर्यादेपेक्षा दुप्पट होती. एका महिन्यानंतर, चाचणीत त्याच्या श्वासामध्ये 0.71 मिलीग्राम अल्कोहोल आढळले होते. बेल्जियममध्ये अल्कोहोलची कायदेशीर मर्यादा 0.22 मिलीग्राम आहे.

यापूर्वी 2019 मध्येही, मद्यपान केलेले नसतानाही त्याला ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी त्याला दंड ठोठावत त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आले होते.

ऑटो-ब्रेव्हरी सिंड्रोम म्हणजेच ABS हा एक विचित्र आजार आहे. जो जगभरातील सुमारे 20 लोकांना होतो. या रोगात, त्या व्यक्तीच्या पोटात कार्बोहायड्रेट्स फर्मेंटेश होते, ज्यामुळे इथेनॉल तयार होते. जेव्हा रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण वाढते तेव्हा हे इथेनॉल लहान आतड्यात शोषले जाते.

या प्रकारच्या आजाराचे निदान पहिल्यांदा जपानमध्ये 1952 मध्ये करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा आतड्यातील विशिष्ट प्रकारच्या बुरशीची वाढ कर्बोदकांना अल्कोहोलमध्ये रूपांतरित करते.

क्रॉन्स डिसीज, मधुमेह, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारख्या इतर परिस्थिती देखील ABS होण्याचा धोका वाढवू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com