'आम्ही स्थानिक कायद्याचे पालन करण्यासाठी प्रतिबध्द आहोत' सुंदर पिचाईंनी केलं स्पष्ट

We are committed to abiding by local law Sundar Pichai said
We are committed to abiding by local law Sundar Pichai said
Published on: 
Updated on: 

मोदी सरकारने (Modi Government) आणलेल्या नव्या डिजिटल नियमावलीवरुन व्हॉट्सअ‍ॅप आणि केंद्र सरकार यांच्यात न्यायलयात वाद सुरु आहे. मोदी सरकारने आणलेल्या नव्या नियमांना व्हॉट्सअ‍ॅपने (Whatsapp) विरोध केला आहे. त्यामुळे देशातील राजकिय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. एकंदरीत सोशल मिडिया कंपन्यांमध्ये तीव्र घमासान पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गुगुलचे (google) मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (We are committed to abiding by local law Sundar Pichai said)

सुंदर पिचाई यांनी आज या नव्या नियमांच्या बाबत असणारी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,  'कंपनी स्थानिक कायद्यांचे पालन करण्यासाठी आणि सरकारांशी रचनात्मक पध्दतीने जोडले जाण्यासाठी वचनबध्द आहे. वेगाने विकसीत होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला योग्य पध्दतीने चालना देण्यासाठी सरकारे काही नियामक चौकटी तयार करत असतात. 

पिचाई यांनी एशिया पॅसिफिक विभागातील काही निवडक पत्रकारांसह व्हर्चुअल परिषदेत सहभाग घेतला होता. ते यावेळी म्हणाले, ''आम्ही प्रत्येक देशांमध्ये नेहमीच स्थानिक कायद्यांचे पालन करत आलो आहोत. आणि आम्ही यासाठी रचनात्मक कार्य करतो. आमच्याकडे स्पष्ट पारदर्शकता अहवाल आहे, जेव्हा आम्ही सरकारी नियमांचे पालन करतो तेव्हा त्या पारदर्शकता अहवालामध्ये तशाप्रकारे नमूद करतो''

पिचाई पुढे म्हणाले, ''स्वातंत्र आणि इंटरनेट या मुक्त गोष्टी आहेत. आणि विशेष म्हणजे भारतामध्ये पूर्वीपासून परंपरा राहीली आहे. एक व्यवसायिक कंपनी म्हणून आम्हाला मुक्त इंटरनेटचे मूल्य आणि त्याचे फायदे याबद्दल स्पष्टपणे माहिती आहेत. आम्ही जगभरातील नियमकांशी सर्जनशील पध्दतीने जोडले जात असतो.''

मोदी सरकारच्या नव्या नियमांच्या विरोधात व्हॉट्सअ‍ॅपने न्यायलयाचे दार ठोठावले होते. या नव्या धोरणांमुळे युझर्सच्या गोपनियतेवर होणाऱ्या परिणामांचा हवाला देत व्हॉट्सअ‍ॅपने आपला अर्ज न्यायालयासमोर मांडला आहे. नव्या नियमावलीच्या विरोधात दिल्ली उच्चन्यालयात व्हॉट्सअ‍ॅपने याचिका दाखल केली आहे. भारत सरकारने तयार केलेले नवे नियम युझर्सच्या गोपनियतेची सुरक्षा खंडीत करण्यास भाग पाडतील, असा दावा व्हॉट्सअ‍ॅपनं केला आहे.

दुसरीकडे सरकारने नवीन डिजिटल नियमांचा पूर्ण निष्ठेने बचाव करत बुधवारी सांगितले की, ते गोपनियतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि नव्या आयटी नियमांनुसार ओळखल्या गेलेल्या संदेशाचे मूळ स्त्रोत सांगण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने सारख्या सोशल मिडिया कंपन्यांना विचारणे म्हणजे गोपनियतेच्या उल्लंघन नाही. यासह सरकराने नव्या नियमांबाबत सोशल मिडिया कंपन्यांकडून अनुपालन करण्यासंबंधी अहवाल मागितला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.