Vladimir Putin: 'रशियाविरोधातील युद्ध समजले जाईल'

‘नो फ्लाय झोन’वरून पुतीन यांचा अमेरिकेला इशारा
Russia Ukraine War
Russia Ukraine Wardainikgomantak
Published on
Updated on

किव्ह: युक्रेनवरील आक्रमणानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना आज शनिवारी अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनीही त्यांना निर्वाणीचा इशारा दिला.

‘कोणत्याही त्रयस्थ गटाने युक्रेनवर ‘नो फ्लाय झोन’ घोषित करणे हा सशस्त्र संघर्षातील त्याचा सहभाग मानण्यात येईल तसेच ते रशियाविरोधातील युद्ध समजले जाईल, हे कृत्य करणारे कोणत्या गटाचे आहेत याचा फारसा विचार होणार नाही’ असे पुतीन यांनी म्हटल्याने जगाच्या चिंता वाढल्या आहेत.

Russia Ukraine War
Russia-Ukraine War: 'पाश्चिमात्य देशांचे आर्थिक निर्बंध युद्धाच्या घोषणेसारखे'

दुसरीकडे भारताने ऑपरेशन गंगाअंतर्गत आज पंधरा विमानांच्या माध्यमातून तीन हजार भारतीयांना मायदेशी आणले. आतापर्यंत जवळपास 14 हजार नागरिक युक्रेन आणि लगतच्या देशांतून भारतात परत आलेत.

युद्धविरामावरून शीतयुद्ध: रशियाने आज शनिवारी मारियोपोल आणि व्होल्नोवाखा या युक्रेनमधील दोन शहरांमध्ये तात्पुरता युद्धविराम जाहीर केला होता. ही शस्त्रसंधी पाच तासांसाठी होती. रशियन संरक्षण मंत्रालयाने हा दावा केला असला तरी युक्रेनने मात्र तो फेटाळून लावला. येथे अडकून पडलेल्या लोकांना रशियाचे सैनिक बाहेर पडण्यास मज्जाव करत आहेत, असा आरोप युक्रेनने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com