VIDEO: "PM मोदींवर दबाव आणणं विसरा!", ट्रम्प यांच्या दबावाच्या नीतीला पुतिन यांचं सडेतोड उत्तर; रशियानं पाळला मैत्री धर्म!

Vladimir Putin Praises PM Modi Foreign Policy: जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि भारताच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Donald trump pm modi & Vladimir Putin
Donald trump pm modi & Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

Putin Warns Trump On India Relations: जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि भारताच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू घेत उघडपणे पाठिंबा दर्शवला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरुन कौतुक केले. याचवेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या संदर्भात एक कडक आणि थेट इशाराही दिला.

पुतिन यांनी भारताचा गौरव करताना म्हटले की, भारत हा एक सार्वभौम देश असून रशियाचा सर्वात समजूतदार मित्र आणि अत्यंत विश्वासू सहकारी आहे. आज भारत हा जगातील एक प्रमुख आणि अग्रगण्य आर्थिक शक्ती बनला असून रशियासोबतचे त्याचे संबंध कमालीचे घट्ट आहेत.

Donald trump pm modi & Vladimir Putin
India Russia Oil Import: "दुसऱ्यांच्या तालावर नाचणारा भारत नाही'' रशियन तेल खरेदीसाठी देशाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही; ऊर्जा निर्णयात सरकार सार्वभौम

सेंट पीटर्सबर्ग येथे जगातील आघाडीच्या वृत्तसंस्थांच्या प्रमुखांसोबत घेतलेल्या एका विशेष बैठकीत पुतिन यांनी भारत (India), अमेरिका आणि पाकिस्तान या देशांबाबत रशियाची भूमिका स्पष्ट केली. पाश्चात्त्य देश, विशेषतः अमेरिका, भारत आणि रशिया यांच्यातील वाढत्या सहकार्यावर सातत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी अमेरिकेला सुनावले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव आणण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे निरर्थक आहे.

अमेरिकेने भारतावर आणि त्यांच्या नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचे परिणाम स्वतः अमेरिकेच्या (America) आंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय संबंधांसाठी हानीकारक ठरतील. भारत आणि रशियाचे संबंध विश्वासाच्या मजबूत पायावर उभे असून कोणताही बाह्य दबाव किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे संबंध बिघडू शकत नाहीत.

Donald trump pm modi & Vladimir Putin
Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

अमेरिकेने भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याबाबत अनेकदा दबाव आणला. मात्र, पुतिन यांनी स्पष्ट केले की, भारताचे रशियासोबतचे संबंध केवळ कच्च्या तेलाच्या खरेदीपुरते मर्यादित नाहीत. जर भारताचे इतर देशांसोबत सहकार्य वाढत असेल, तर त्याचा रशियासोबतच्या संबंधांना कोणताही धोका नाही. भारत नेहमीच आपल्या राष्ट्रीय हितांना सर्वोच्च प्राधान्य देऊन निर्णय घेतो आणि हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.

Donald trump pm modi & Vladimir Putin
India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

रशिया आणि भारतामधील द्विपक्षीय संबंध केवळ टिकून राहणार नाहीत, तर ते भविष्यात अधिक मजबूत होत राहतील, असे संकेत पुतिन यांनी दिले. येत्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुतिन यांच्या या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताची परराष्ट्र नीती किती स्वावलंबी आणि मजबूत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून अमेरिकेला स्वतःच्या मर्यादांची जाणीव करुन देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com