Video: अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांवर हल्ला, 'I Hate Indians' म्हणत दाखवला बंदूकीचा धाक

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांवर वर्णभेदावरून हल्ला केल्याचे लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे.
Video
VideoTwitter
Published on
Updated on

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांवर वर्णभेदावरून हल्ला केल्याचे लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे. अमेरिकन-मेक्सिन महिलेने टेक्सासच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या 4 भारतीय महिलांशी केवळ गैरवर्तनच केले नाही, तर त्यांना मारहाण केल्यानंतर बंदुकीतून गोळ्या घालण्याची धमकीही दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मेक्सिकन पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

टेक्सासमधील डॅलस येथील हॉटेलमध्ये जेवण करून चार भारतीय वंशाच्या महिला पार्किंगच्या दिशेने चालल्या होत्या. तेवढ्यात अचानक एक मेक्सिकन-अमेरिकन वंशाची महिला तिथे आली. त्या महिलेने भारतीय महिलांवर अटॅक करण्यास सुरुवात केली. ती महिला म्हणाली, 'मला भारतीयांचा तिरस्कार आहे. सर्व भारतीय चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत येतात. असे म्हणत भारतीय वंशाच्या महिलांवर ती महिला अटॅक करत राहिली. आरोपी महिलेने सांगितले की, तिचा जन्म अमेरिकेत झाला, पण ती जिथे जाते तिथे तिला भारतीयच दिसतात. जर भारतात जीवन चांगले आहे तर तुम्ही लोक इथे का आलात? असा प्रश्न करत तिने त्या महिलांवर राग व्यक्त केला.

Video
Syria: रॉकेट हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक जखमी, अमेरिकेनेही दिले चोख प्रत्युत्तर

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत एका व्यक्तीने लिहिले की, 'माझी आई आणि तिच्या 3 मैत्रिणी डॅलसमध्ये जेवायला गेले होते. ते पार्किंगमध्ये परतत असताना एक मेक्सिकन-अमेरिकन महिला तिथे आली. चौघांवर वर्णभेदावरून टीका करताना तिने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे गैरवर्तन वाढत असल्याचे पाहून आईने त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. हे पाहून महिलेला राग आला आणि तिने आई आणि तिच्या मैत्रिनींना मारहाण करण्यास सुरुवात केली.

Video
Philippinesमध्ये दिल्लीच्या टोळीचा गॅंगवॉर, मुसेवाला हत्याकांडाशी होता जवळचा संबंध

पोलिसांनी गंभीर कलमे लावली

आरोपी मेक्सिकन-अमेरिकन महिलेचे नाव एस्मेराल्डा अप्टन असे असून ती टेक्सासमधील प्लानो येथील रहिवासी आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, टेक्सासमधील प्लानो शहरातील पोलिसांनी गुरुवारी दुपारपर्यंत एस्मेराल्डा ऑप्टन या महिलेला अटक केली. त्याच्यावर वर्णभेदावरून केलेल्या कृत्याप्रकरणी धमकी देण्याबाबत कलम लावण्यात आले होते. एस्मेराल्डाला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे. प्लानो आणि डॅलसमधील अंतर फक्त 31 किलोमीटर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायाने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com