US Student Loan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न $1,25,000 पेक्षा कमी आहे अशा यूएस विद्यार्थ्यांचे शैक्षणीक कर्ज माफ केले जाईल. विद्यार्थींचे कर्ज कमी करणे हे बायडन प्रशासनाचे मोठे निवडणूक आश्वासन होते.
यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे की, मी निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करणार आहे. मध्यमवर्गीयांना थोडा दिलासा देण्यासाठी आम्ही जानेवारी 2023 मध्ये काही अमेरिकन विद्यार्थ्यांची कर्जे माफ करणार आहोत किंवा कमी करणार आहोत.
बायडनची कर्जमाफी मोहीम काय आहे?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विद्यार्थी कर्ज माफीची घोषणा केली आहे. मात्र काही अटींसह त्यांनी ही घोषणा केली आहे. या अटी खालीलप्रमाणे आहेत...
तुम्ही पेल ग्रँटवर कॉलेजमध्ये गेल्यास, तुम्हाला $20,000 ची सूट मिळेल आणि तुम्ही पेल ग्रँटचा लाभ न घेतल्यास, तुम्हाला फक्त $10,000 ची सूट मिळेल. त्यावरही, ही सूट फक्त त्या लोकांनाच मिळेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न $125,000 पेक्षा कमी आहे.
त्याच वेळी, बायडन प्रशासनाने डिसेंबर 2022 पर्यंत कर्जाची रक्कम कमी केली आहे. 32 डिसेंबर 2022 पर्यंत कर्ज द्यावे लागणार नाही. यानंतरही तुम्ही कर्ज जमा केल्यास, त्या कर्जासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या फक्त 5 टक्के रक्कम जमा करावी लागेल. उदाहरणार्थ, तुमचे उत्पन्न दरमहा 100 रुपये असल्यास, तुम्हाला फक्त 5 रुपये कर्जाचा हप्ता जमा करावा लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.