जो बायडेन यांची रशियाला धमकी, युक्रेनवरती हल्ला केला तर...

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास नॉर्ड स्ट्रीम 2 होणार नाही, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी दिली आहे.
America
AmericaDainik Gomantak

युक्रेनच्या संकटामुळे अमेरिका (America) आणि रशिया (Russia) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकदा रशियाला इशारा दिला होता. रशियाने युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यास नॉर्ड स्ट्रीम 2 होणार नाही, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (President Joe Biden) यांनी सोमवारी दिली आहे.

बिडेन म्हणाले की, रशियाचा महत्त्वाकांक्षी गॅस पाइपलाइन प्रकल्प नॉर्ड स्ट्रीम 2 बांधू देणार नाही. गॅस पाइपलाइन प्रकल्प नॉर्ड स्ट्रीम 2 कसा थांबवला जाईल हे त्यांनी स्पष्ट केले नाहीये. युक्रेनच्या सीमेजवळ रशियन सैन्य जमा झाल्यापासून अमेरिका अत्यंत सावध आहे आणि रशियाच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवून आहे.

America
ऑस्ट्रेलिया दोन वर्षांनंतर उघडणार पर्यटकांसाठी आपले दरवाजे

अध्यक्ष जो बायडेन, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास गॅस पाइपलाइन प्रकल्प नॉर्ड स्ट्रीम 2 प्रगती करू देणार नाही. आम्ही ते संपवू.

जेव्हा बायडेन यांना विचारण्यात आले की ते हे कसे करतील, तेव्हा त्यांनी सरळ उत्तर दिले की मी तुम्हाला वचन देतो की आम्ही ते करू शकू. युक्रेनमधील संभाव्य रशियन लष्करी हल्ल्याविरोधात अमेरिका आणि जर्मनीने संयुक्त आघाडी सादर करण्याचे वचन दिले आहे.

हा रशियाचा महत्त्वाकांक्षी पाण्याखालील गॅस पाइपलाइन प्रकल्प आहे, नॉर्ड स्ट्रीम 2 पश्चिम रशियामधून ईशान्य जर्मनीपर्यंत घेतला आहे. या गॅस पाइपलाइनची लांबी सुमारे 1275 किमी आहे. हा प्रकल्प गॅझप्रॉम या रशियन सरकारी मालकीच्या कंपनीच्या मालकीचा आहे, हे काम जवळपास पूर्ण झाले आहे पण त्याला युरोकच्या एजन्सीकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

विशेष म्हणजे, युक्रेनच्या सीमेजवळ रशियाने 100,000 हून अधिक सैन्य जमा केले, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याच वेळी, रशियाने आपण कोणत्याही हल्ल्याची योजना आखत नसल्याचा आग्रह धरला आहे. युक्रेनला नाटोचे सदस्य बनवले जाणार नाही, अशी हमी रशियाने अमेरिकेकडे मागितली आहे, मात्र अमेरिका ती मानायला तयार नाहीये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com