Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मात्र आतापर्यंत शांततेची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्याचबरोबर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनीही या युद्धात उडी घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर जोरदार टीका केली आहे. पुतिन जिंकणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी रशियाला वेढा घालण्यासाठी 12 हजार सैनिक पाठवले आहेत. आता हे युद्ध अत्यंत धोकादायक टप्प्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. (Russia-Ukraine War)
आम्ही नाटोच्या प्रत्येक क्षेत्राच्या प्रत्येक इंचाचे संरक्षण करू, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनविरुद्ध करत असलेले युद्ध जिंकू शकणार नाही, असे बायडन म्हणाले. त्याचवेळी युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध न लढण्याचा आग्रहही त्यांनी केला. बायडन यांनी रशियाच्या सीमेला लागून असलेल्या लॅटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि रोमानियामध्ये सैन्य पाठवले आहे.
सहकाऱ्यांसोबत उभे राहणार
युक्रेनच्या लोकांनी रशियाच्या लष्करी हल्ल्याचा सामना करताना शौर्य आणि धैर्य दाखवले आहे, त्यामुळे अमेरिका आपल्या बचावात मागे हटणार नाही,आम्ही युक्रेनला पाठिंबा देत राहू, आम्ही युरोपमधील आमच्या मित्र राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ देऊ,असे अमेरिकेचे अध्यक्ष बायडन म्हणाले.
युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध लढायचे नाही
मी माझ्या 12 हजार सैनिकांची तुकडी रशियाला वेढा घालण्यासाठी रशियन सीमेवर पाठवली आहे. हे सैनिक रशियाला लॅटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया, रोमानियामध्ये घेरतील. जर आपण यावेळी प्रतिकार केला तर तिसरे महायुद्ध नक्कीच होणार हे स्पष्ट आहे. पण आम्ही नाटोचे रक्षण करण्याचा निर्धार केला आहे. आम्ही युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही, असेही बायडन आज म्हणाले.
आम्ही रशियाला एकटे पाडण्यास सक्षम आहोत
जो बायडन यांनी धमकीवजा शब्दात सांगितले की, आम्ही पुतिन यांच्यावरील आर्थिक दबाव वाढवून रशियाला जागतिक स्तरावर एकटे पाडण्यास सक्षम आहोत. तसेच अमेरिकन पायलट आणि अमेरिकन सैनिक विमाने आणि रणगाडे घेऊन निघून जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आता G-7 देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका यांनी रशियावर बंदी घालण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.