अमेरिकेच्या नौदलाची भारताला धमकी; काय आहे FONOP? जाणून घ्या

indian Navy.jpg
indian Navy.jpg
Published on
Updated on

संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढा देत असताना भारताचा मित्रदेश  म्हणून मानल्या जाणाऱ्या अमेरिकेनेच भारताला धमकावल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी लसीकरण गती वाढविण्यासाठी आणि कोरोनाच्या नवीन प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासंबंधी चर्चा करत होते, तेव्हा अमेरिका भारताला धमकावत होती. अमेरिकेच्या नौदलाने परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसून भारताला धमकावल्याचे स्वत:  मान्य केले आहे. भारतानेही यावर आक्षेप नोंदविला आहे. पण अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाला काही फरक पडलेला दिसत नाही.  तथापि, माजी सैन्य अधिकाऱ्यांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.  अमेरिकेच्या नौदलातील सर्वात मोठी फ्लीट मानल्या जाणाऱ्या 7 व्या फ्लीटने भारतीय हद्दीत घुसून भारतीय नौदलाला धमकावल्याचा दावा केला आहे. 1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामा दरम्यान अमेरिकेने भारतावर दबाव आणण्यासाठी बंगालच्या उपसागरात याच 7फ्लीट तुकडीला तैनात केले होते. (US Navy threatens India; What is FONOP? Find out) 

नक्की काय आहे हे प्रकरण? 
गेल्या बुधवारी म्हणजे 7 एप्रिल रोजी, अमेरिकेचे हवामानविषयक राजदूत जॉन कॅरी भारत दौऱ्यावर होते  तेव्हा यूएस नेव्हीचे डिस्ट्रॉयर (विनाश करणारे एक जहाज) यूएसएस जॉन पॉल जोन्स (डीडीजी 53)  परवानगीशिवाय भारताच्या हद्दीत घुसले आणि भारताला धमकी दिली. इतकेच नव्हे तर भविष्यातही असे करण्याचा इशाराही दिल. यूएन सागरी कायद्यानुसार, समुद्र किनाऱ्यापासून 200 नाविक मैल  (370 किमी) एक विशिष्ट आर्थिक क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत भारताच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी अमेरिकेच्या जहाजाने भारताची परवानगी घेणे आवश्यक होते,  परंतु तसे न करता अमेरिकन जहाजाने 130 नाविक मैल (240 किमी) आत प्रवेश केल्याचा दावा स्वतः अमेरिकन नौदलाच्या 7 व्या ताफ्याने केला आहे.

फ्रीडम ऑफ नॅव्हीगेशन ऑपरेशन (FONOP) म्हणजे काय आणि हे भारतात का? 
अमेरिकेच्या नौदलाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.  ही कारवाई म्हणजे  फ्रीडम ऑफ नॅव्हीगेशन ऑपरेशन (नौकानयन शास्त्राचे स्वातंत्र्य) होते.  जे देश त्यांच्या देशातील सागरी हद्दीतील सीमा वाढवून सांगत असतात त्या देशांच्या सागरी हद्दीत घुसून त्यांना आव्हान दिले जाते. हे कोणत्याही एका देशाच्या विरोधात नाही किंवा हे कोणत्याही प्रकारचे राजकीय विधान नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.  यूएस नेव्ही 1979 पासून अशी कारवाई करीत आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकन सैन्य ही कारवाई दररोज करत असते. सर्व मोहीमा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार डिझाइन करण्यात आल्या आहेत.  यामुळे अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार या कारवाया सुरूच ठेवणार असल्याचे दिसून येत आहे. 

तथापि, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. भारतीय सुरक्षा दलांनी जहाज जाईपर्यंत सतत निरीक्षण केले. भारताने अमेरिकेला विशिष्ट आर्थिक क्षेत्र घुसखोरीशी संबंधित चिंतेची जाणीवही करुन दिली आहे. परंतु अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले की त्याचे कार्यवाही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत आहे. त्याचवेळी भारत आपली सीमा वाढवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com