US Navy Fighter Jets Crash: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! एअर शोदरम्यान दोन फायटर जेट्सची हवेतच टक्कर, अंगावर काटा आणणारा Video

US Navy Fighter Jets Crash Video: एअर शो दरम्यान अनेकदा मोठे अपघात घडत असतात. अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी भीषण दुर्घटना अमेरिकेतील आयडाहो (Idaho) राज्यातून समोर आली आहे.
US Navy Fighter Jets Crash
US Navy Fighter Jets CrashDainik Gomantak
Published on
Updated on

एअर शो दरम्यान अनेकदा मोठे अपघात घडत असतात. अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी भीषण दुर्घटना अमेरिकेतील आयडाहो (Idaho) राज्यातून समोर आली आहे. येथील 'माऊंटन होम एअर फोर्स बेस' जवळ आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध 'गनफाइटर स्काईज' (Gunfighter Skies) एअर शो दरम्यान दोन अत्याधुनिक लढाऊ विमानांची हवेतच एकमेकांशी जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भयानक होता की, विमानांची टक्कर होताच आकाशात आगीचा गोळा निर्माण झाला आणि दोन्ही विमाने क्षणात जमिनीवर कोसळली.

हवेमध्ये चित्तथरारक कसरती दाखवण्याच्या प्रयत्नात दोन्ही विमानांचे पायलट एकमेकांच्या अत्यंत जवळ आले आणि विमानांचे नियंत्रण सुटल्याने ही टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर दोन्ही विमाने वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळली. विमाने जमिनीवर आदळताच अत्यंत भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे साम्राज्य पसरले. हा थरार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणाऱ्या हजारो प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

US Navy Fighter Jets Crash
Goa Beach: गर्दीपासून दूर आणि बागा-कळंगुटच्या अगदी जवळ; गोव्यात फिरायला जाताना 'हा' सुंदर बीच कधीही चुकवू नका!

पायलट्सचे नशीब बलवत्तर, पॅराशूटमुळे वाचले प्राण

या अत्यंत भीषण अपघातात सुदैवाने एक मोठी दुर्घटना टळली आहे. 'आयडाहो स्टेट्समन'च्या अहवालानुसार, विमानांची टक्कर झाल्यानंतर अत्यंत अचूक वेळेत दोन्ही जेट्समधील चारही अमेरिकन नौदलाच्या (US Navy) पायलट्सनी विमानाबाहेर उडी मारली. एअर शोच्या उद्घोषकाने तातडीने गर्दीला शांत करत सांगितले की, आकाशात 'चार सुरक्षित पॅराशूट' उघडताना दिसले आहेत. सर्व पायलट दुर्घटनेच्या ठिकाणापासून साधारण एक मैल अंतरावर सुरक्षित स्थितीत सापडले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

US Navy Fighter Jets Crash
Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

लष्करी बेस लॉकडाऊन, उच्चस्तरीय चौकशी सुरू

या अपघातानंतर माऊंटन होम एअर फोर्स बेसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातानंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ संपूर्ण बेस लॉकडाऊन केला होता. विमानाचा ढिगारा हटवण्यासाठी आणि लागलेली आग विझवण्यासाठी आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला, तर सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ प्रेक्षकांना बेसबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, तो पाहून नेटिझन्सच्या अंगावर काटा येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Helicopter Crash Indonesia
Air India Ticket Prices To Rise
Iran Shoots Down US F-35 Fighter Jet
Iranian Shahed-136 Drone vs US F-15
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com