'दहशतवाद्यांनी, दहशतवाद्यांद्वारे आणि दहशतवाद्यांसाठीचे तालिबान सरकार'

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या तालिबानच्या घोषणेवर अमेरिकेतील टॉप रिपब्लिकन कायदेतज्ञ (American lawmakers) यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
Taliban Government
Taliban GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या तालिबानच्या घोषणेवर अमेरिकेतील टॉप रिपब्लिकन कायदेतज्ञ (American lawmakers) यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तालिबानने मंगळवारी अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापनेची (Taliban Government) घोषणा केली. या सरकारमधील प्रत्येक सदस्याचे नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अभ्यास समितीने म्हटले, 'फसवू नका. तालिबान सरकारमध्ये कोणीही उदारमतवादी नाही. हे दहशतवाद्यांनी, दहशतवाद्वारे आणि दहशतवाद्यांसाठीचे सरकार आहे. ही समिती हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये विरोधी पक्षाचा सर्वात मोठा 'कॉकस' असून जिम बँक्स (Jim Banks) हे अध्यक्ष आहेत. "तालिबानच्या नवीन मंत्रिमंडळात गुआंतानामो बे कारागृहातील कैदी, दहशतवादी आणि अल कायदा आणि हक्कानी नेटवर्कसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्यांचा समावेश आहे," असे खासदार टिम बोशेट (Tim Boshett) यावेळी म्हणाले.

Taliban Government
अफगाणिस्तान मुद्द्यावरून चिदंबरम यांनी टोचले UNSCचे कान

ते पुढे म्हणाले की, तालिबान्यांचा सरकार चालवण्याचा मार्ग आणि मूलतत्त्ववादी मान्यतांचा त्याग करण्याचा कोणताही हेतू नाही. बायडन प्रशासन अमेरिकी नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या सहयोगींवर मूर्खपणे विश्वास ठेवत आहे. बोचेट म्हणाले, राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी तालिबान्यांच्या विरोधात धाडसी पावले उचलावीत. तसेच तालिबान्यांनी दाखवून दिले पाहिजे की, ते अमेरिकनांना धोक्यात आणू शकत नाहीत किंवा कोणत्याही दहशतवादी कारवाया करु शकत नाहीत, अन्यथा त्यांना या दहशवादी कारवायांसाठी जबाबदार धरले जाईल. 'रिपब्लिकन खासदार म्हणाले,' हे दहशतवादी, दहशतवाद्यांचे आणि दहशतवाद्यांसाठीचे सरकार आहे.

Taliban Government
UNSC मध्ये अफगाणिस्तान ठरावावर मतदानासाठी चीन, रशियाची अनुपस्थित

त्याच वेळी, खासदार बेन सासे (Ben Sase) म्हणाले, 'राष्ट्राध्यक्ष बायडन यांना माहित नाही की, तालिबान प्रेमळ झाला आहे, त्याचबरोबर त्याच्या वर्तानामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचे कोणतेच कारण नाही. त्याचबरोबर खासदार स्कॉट फ्रँकलिन यांनी ट्वीट करत म्हटले की, 'नवीन तालिबान जुन्या तालिबान सारखाच आहे आणि वांछित असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादही आहे. याचे कोणाला आश्चर्य वाटयला का? '

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com