US Midterm Elections: सिनेटवर बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाचे वर्चस्व

प्रतिनिधीगृहात मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपल्बिकन पक्ष पुढे
joe biden
joe biden Dainik Gomantak

US Midterm Elections: अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीतून येथे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटवर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाचे वर्चस्व राखले आहे. 100 सदस्य असलेल्या या सभागृहात 50 जागा डेमोक्रेटिक पक्षाकडे आल्या आहेत. (US Midterm Elections 2022 Results)

joe biden
Pakistan's Drones : सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीत तब्बल 250 टक्क्यांची वाढ

रिपल्बिकन पक्षाकडे 49 जागा आहेत, तर एका जागेवरील निकाल अद्याप घोषित व्हायचा आहे. आता दोन वर्षांसाठी सिनेटवर डेमोक्रेट्सचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.

नेवाडा आणि अॅरिझोना येथे चुरशीच्या लढतीत बायडेन यांच्या पक्षाने विजय मिळवला आहे. त्यामुळे सिनेटमध्ये त्यांच्याकडे बहुमत आले आहे. आता केवळ आणखी एक जागा त्यांना हवी आहे. जॉर्जिया येथील निकाल अद्याप घोषित व्हायचा आहे.

सिनेटवर वर्चस्व राखल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, मला माहिती आहे मी आणखी भक्कम होत आहे. मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही गोष्ट चांगली आहे. आता मी आणखी काही वर्षांच्या विचार करत आहे.

दरम्यान, नेवाडा येथे डेमोक्रेटिक कॅथरीन कोर्टेज मस्टो यांचा पराभव होईल, असे रिपब्लिकन पक्षाला वाटत होते, पण त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे डेमोक्रेटच्या सिनेटमधील बहुमतावर शिक्कामोर्तब झाले आहे. मस्टो यांनी अॅडम लक्साल्ट यांना पराभूत केले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्साल्ट यांना पाठिंबा दिला होता.

joe biden
Watch Video: अमेरिकेत एअर शो दरम्यान दोन विमानांची धडक, 6 लोकांचा मृत्यु

ज्या जागांवर उमेदवार पन्नास टक्क्यांहून अधिक मते मिळवू शकत नाहीत तिथे सहा डिसेंबर रोजी पुन्हा निवडणूक होणार आहे. जॉर्जियात डेमोक्रेटिक पक्षाचे राफेल वार्नोक 49.4 टक्के मतांसह आघाडीवर आहेत. 6 डिसेंबर रोजी रिपल्बिकन उमेदवार हर्शल वॉकर यांना जर त्यांनी मात दिली तर डेमोक्रेटिक पक्षाकडे सिनेटमध्ये 51 जागा असतील.

सिनेटवर डेमोक्रेटिक पक्षाचे वर्चस्व असले तरी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये ट्रम्प यांचा रिपल्बिकन पक्ष आघाडीवर आहे. तथापि या प्रतिनिधी गृहावर कुणाचे वर्चस्व असणार, हे अद्याप निश्चित्त झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com