वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) सिनेटमध्ये तंत्रज्ञान संशोधन (Technology Research) आणि उत्पादनास (Production) प्रोत्साहन देणारे विधेयक (Bill) आणण्यात आले आहे. अमेरिकेच्या इतिहासामध्ये काही मोठ्या ठरावापैकी एक असे याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे हे बिल पास करण्यासाठी डेमोक्रेटीक (Democratic) आणि रिपब्लीकन (Republican) पक्षांचे खासदार एकत्र आले आहेत. या नवीन विधेयकामुळे अमेरिकेची अंतरराष्ट्रीय स्थरावर चीनशी स्पर्धा वाढणार आहे.
अर्थत हे बिल अद्याप हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटीव्हमध्ये (House of Representatives) पारीत होणे बाकी आहे. त्यानंतर याची अंमलबजावणी करण्यात येईल. हे बील अमेरिकेच्या इतिहास आणि वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील एक मोठ्या बीलांपैकी आहे. सिनेटचे नेते चक स्कमर हे बील मंजूर झाल्यावर अमेरिका फक्त संशोधनातच पुढे जाणार नाही तर उत्पादनात देखील खूप पुढे जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात औद्योगिक क्षेत्रात स्पर्धा वाढू शकेल.
या विधेयकाद्वारे 250 अब्ज डॉलर्स टेक्नोलॉजी रिसर्च, सेमीकंडक्टर डेवलपमेंट आणि रोबोट मेकर्स, चिप मेकर्स यावर खर्च करण्यात येणार आहे. संगणामध्ये चीप नसल्यामुळे त्याचा ऑटोमोबाईलवर परिणाम होत आहे. तसेच चीनी बनावटीच्या ड्रोनवर अमेरिका बंदी घालणार आहे. अमेरिकेमध्ये होणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये चीनचा हात आसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यावर चीनवर बंदी घालण्यास मदत होईल. या विधेयकाच्या समर्थनार्थ 68 मते तर विरोधात 32 मते पडली आहेत.
तज्ज्ञांच्या मते, हे बील मंजूर झाल्याने असे स्पष्ट होत आहे की, चीनच्या आर्थिक आणि सैन्य या दोन्ही मनसुब्यांना हणून पाडण्यासाठी अमेरिकेतील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.