US Mass Shooting: अमेरिकेत बेछूट गोळीबार! चार जणांनी गमावला जीव

US Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत.
US  Shooting
US ShootingDainik Gomantak

US Mass Shooting: अमेरिका हा देश संपूर्ण जगात महासत्ता या ओळखीशिवाय शांतता आणि सुवस्थेसाठी ओळखला जातो. अमेरिकेच्या या ओळखील धक्का देणाऱ्या घटना अमेरिकेत वाढताना दिसून येत आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेत घडल्याची माहीती समोर आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. आता वॉशिंग्टनमध्ये एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने गदारोळ माजला आहे. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे.

गोळीबाराची ही घटना वॉशिंग्टनच्या सिएटल शहरात असणाऱ्या सुपर मार्केटच्या बाहेर घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत खलिस्तानी गटाचा मोर्चा निघाल्याचे दिसून आले होते. अमेरिकेसह ब्रिटन आणि कॅनडामध्ये देखील हा मोर्चा निघाला होता. स्वतंत्र खलिस्तानी देश निर्माण करण्याची मागणी, भारताला विरोध आणि खलिस्तानी देशाच्या समर्थकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने हा मोर्चा काढला होता. त्यावेळी देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आता सतत होणाऱ्या गोळाबाराने अमेरिकेतील शांतता आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. अमेरिकेत अनेक लोक नोकरीसाठी जगभरातून स्थायिक होत असतात, त्यामुळे आता संपूर्ण जगभरातील देश आपले नागरिक अमेरिकेत असल्याने सततच्या गोळीबाराच्या घटनांमुळे चिंता व्यक्त करत आहेत.

US  Shooting
New Variant of Corona: क्रोनिक इन्फेक्शननंतर रुग्णामध्ये आढळला सर्वात उत्परिवर्तित कोविड प्रकार

अमेरिकेत गोळीबारीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी गोळीबारची घटना घडताना दिसत आहे. अमेरिकेत शस्त्र बाळगण्यच्या स्वातंत्र्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत प्रत्येक 100 व्यक्तीमधील 88 लोकांजवळ बंदुक आहे. आता यावर अमेरिकेचे प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com