China Pneumonia: चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या गूढ आजाराने जगाची चिंता वाढवली आहे. अशा परिस्थितीत जीन्सपासून सुरु झालेला हा आजार संपूर्ण जगात पसरण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. चीनच्या चुकीचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही चीन काहीतरी लपवत असल्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या अनेक सिनेटर्संनी चीनवर प्रवासी बंदी घालण्याची मागणी केली आहे. चीनमध्ये प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील बंधनांमुळे, या रोगाचे स्वरुप काय आहे आणि त्याची वास्तविक परिस्थिती काय आहे हे सांगणे फार कठीण आहे.
सध्या चीनमध्ये रहस्यमय न्यूमोनियाची भीती आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सिनेटर्संनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे अमेरिका आणि चीनदरम्यानच्या प्रवासावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन सिनेटर्सच्या एका गटाने याबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना पत्र लिहिले आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या श्वसनाच्या आजाराबाबत अधिक माहिती मिळेपर्यंत अमेरिका आणि चीनमधील प्रवासावर बंदी घालण्यात यावी, असे त्यात म्हटले आहे.
फुफ्फुसाचा हा आजार अत्यंत धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा कोरोना महामारी सुरु झाली तेव्हा अमेरिकेने वेळेवर निर्बंध लादले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. भूतकाळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती आपण करु शकत नाही, असे अमेरिकन कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचवेळी, उशीरा प्रवास बंदीमुळे अनेक अमेरिकन लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.