PAK च्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला मोठा धक्का; कंपोनेंट्सचा पुरवठा करणाऱ्या 4 कंपन्यांवर प्रतिबंध

US Imposes Sanctions: पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला क्षेपणास्त्राशी संबंधित कंपोनेंट्स पुरवल्याबद्दल अमेरिकेने तीन चिनी कंपन्या आणि बेलारुसच्या एका कंपनीवर निर्बंध लादले आहेत.
PM Shehbaz Sharif
PM Shehbaz SharifDainik Gomantak

US Imposes Sanctions: अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला क्षेपणास्त्राशी संबंधित कंपोनेंट्स पुरवल्याबद्दल अमेरिकेने तीन चिनी कंपन्या आणि बेलारुसच्या एका कंपनीवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. ज्यांच्यावर हे निर्बंध लादण्यात आले आहेत त्यामध्ये तीन चिनी कंपन्यांचा समावेश आहे (शिआन लाँगडे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कं, लि., टियांजिन क्रिएटिव्ह सोर्स इंटरनॅशनल ट्रेड कं, लि. आणि ग्रॅनपेक्ट कंपनी, लि.). याशिवाय बेलारुसमध्ये असलेल्या मिन्स्क व्हील ट्रॅक्टर प्लांटवरही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, स्टेट डिपार्टमेंट एक्झिक्युटिव्ह ऑर्डर 13382 च्या कलम 1 (ए) (ii) नुसार 4 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कलमांतर्गत, मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रे आणि त्यांच्या वितरणाच्या साधनांचा प्रसार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या कंपन्यांनी पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी क्षेपणास्त्राशी संबंधित वस्तूंचा पुरवठा केला आहे. यामध्ये त्याच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचाही समावेश आहे. दुसरीकडे, बेलारुसच्या मिन्स्क व्हील ट्रॅक्टर प्लांटबद्दल बोलायचे झाल्यास त्याने पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी स्पेशल व्हीकल चेसिस पुरवण्याचे काम केले. अशा चेसिसचा वापर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी लॉन्च सपोर्ट म्हणून केला जातो.

PM Shehbaz Sharif
India Pakistan Trade: पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला भारत देणार आधार? व्यापारासंबंधी शाहबाज सरकामधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी पुरवठा

यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, ग्रॅनपेक्ट कंपनी लिमिटेडने पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला फिलामेंट वाइंडिंग मशीनसह क्षेपणास्त्राशी संबंधित उपकरणे पुरवली. रॉकेट मोटर केसच्या उत्पादनात फिलामेंट विंडिंग मशीन वापरली जाते. ग्रॅनपेक्ट कंपनी लिमिटेडने रॉकेट मोटर्सच्या चाचणीसाठी उपकरणे पुरवण्यासाठी पाकिस्तानच्या सुपार्कोसोबत काम केले. याशिवाय, कंपनीने पाकिस्तानच्या एनडीसीला रॉकेट मोटर्सच्या चाचणीसाठीही उपकरणे दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com