अखेर अमेरिकेची अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार, 20 वर्षांनंतर सैन्य मायदेशी

अमेरिकेच्या लष्करी (US Army) कारवायांना 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अखेर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघार घेतले असल्याचे पेंटागॉनने जाहीर केले आहे .
US Army totally  withdrawal from Afghanistan after 20 years
US Army totally withdrawal from Afghanistan after 20 years Dainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेच्या लष्करी (US Army) कारवायांना 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अखेर अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघार घेतले असल्याचे पेंटागॉनने (The Pentagon) जाहीर केले आहे .अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉनने ट्वीट केले की, अफगाणिस्तानातून बाहेर पडणारा शेवटचा अमेरिकन सैनिक (American Soldier) मेजर जनरल ख्रिस डोनाहु आहे, जो 30 ऑगस्ट रोजी काबुलमधील (Kabul) अमेरिकेच्या मोहिमेच्या समाप्तीच्या निमित्ताने सी -17 (C-17) विमानात चढला होता. त्याचबरोबर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी पेंटागॉनच्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार पूर्ण झाली असल्याची घोषणा केली आहे.(US army totally withdrawal from Afghanistan after 20 years)

काल बोलताना जनरल केनेथ मॅकेन्झी म्हणाले की मी अफगाणिस्तानातून आपले सैन्य आणि अमेरिकन नागरिकांना पूर्णपणे बाहेर काढण्याचे लष्करी मिशन समाप्त झाल्याची घोषणा करण्यासाठी आलो आहे . मॅकेन्झी म्हणाले की अमेरिकेचे शेवटचे सी -17 लष्करी विमानाने हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मध्यरात्री उड्डाण केले आहे.

11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाने अमेरिकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन सैनिक 2001 मध्ये तालिबानला सत्तेतून बेदखल करण्यासाठी नाटो आघाडीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानात उतरले होते. अध्यक्ष जो बिडेन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. आणि त्यासाठी 31 ऑगस्टची मुदत देखील निश्चित करण्यात अली होती. त्याच वेळी, इस्लामिक स्टेट-खोरासन (ISIS -K) ने दोन आठवड्यांच्या निर्वासन ऑपरेशन दरम्यान दोन हल्ले केले. आत्मघाती बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन सैनिकांसह 120 हून अधिक लोक ठार झाले. यानंतर काबूल विमानतळावरून शेवटचे उड्डाण कडक सुरक्षेदरम्यान पूर्ण झाले आहे.

दरम्यान यापूर्वीच तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने 31 ऑगस्टनंतर अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये हल्ले करण्याचा अधिकार राहणार नाही असे स्पष्ट केले होते. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, निवेदनात म्हटले आहे की, तालिबानच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार असे कोणतेही आक्रमण सहन करणार नाही

US Army totally  withdrawal from Afghanistan after 20 years
इराणच्या मंत्रिमंडळात बॉम्बस्फोट 'आरोपी' सामील; इंटरपोलने केले वॉन्टेड घोषित

अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या घोषणेनंतर, अफगाणिस्तानवर आक्रमण करत तालिबानने अफगाण सैन्याला पराभूत करून अफगाणिस्तानवर कब्जा केला. अफगाणिस्तानातून सैन्य माघारीच्या अंतिम मुदतीत अजूनही 24 तास शिल्लक होते, परंतु अमेरिकन सैन्याने आधीच उड्डाण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com