UNSC च्या विस्तारासाठी अमेरिकेने दिली मंजूरी; भारत स्थायी सदस्य बनणार?

दुसरीकडे अमेरिकेने (America) म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारास स्थायी आणि अस्थायी दोन्ही सदस्यांसाठी एकमताने आम्ही समर्थन देतो.
UNSC
UNSCDainik Gomantak
Published on
Updated on

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) विस्तारावर भारताचा (India) भर असताना, दुसरीकडे अमेरिकेने (America) म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारास स्थायी आणि अस्थायी दोन्ही सदस्यांसाठी एकमताने आम्ही समर्थन देतो. तथापि, वॉशिंग्टनचे (Washington) म्हणणे आहे की, कौन्सिलची प्रभावकारिता किंवा क्षमता आणि व्हेटोमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये. विशेष म्हणजे, सुरक्षा परिषदेचा विस्तार व्हावा, अशी भारताची बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. अनेक देशांनी भारताला त्याचे स्थायी सदस्य बनवण्याबाबतही बोलले आहे.

UNSC
UNSC: भारतानं अध्यक्ष पद स्विकारताच 'अफगाणिस्तान' वर चर्चा

भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ऑगस्ट महिन्यासाठी मिळाल्याबद्दल विचारले असता, परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस (Ned Price) यांनी गुरुवारी आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, अमेरिका सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदासह भारतासोबत काम करण्याला महत्व देतो. ते पुढे म्हणाले, "आम्ही स्थायी आणि अस्थायी दोन्ही सदस्यांसाठी सुरक्षा परिषदेच्या विस्तारास सहमती देतो." मात्र त्याची प्रभावकारिता, क्षमता आणि व्हेटोमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल किंवा विस्तार कमी करु नये.'

UNSC
UNSC: सुरक्षा परिषद किती शक्तीशाली आहे; जाणून घ्या

भारताला स्थायी सदस्य बनवण्यावर अमेरिकेने काय म्हटले?

बायडन प्रशासनाला असे वाटते की, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असावा? यावर, प्राइस म्हणाले, "आमचा विश्वास आहे की सुरक्षा परिषदेत अशा प्रकारे सुधारणा केली जावी जी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांच्या हितांशी संबंधित असावी. येत्या आठवड्यात सुरक्षा परिषदेच्या संदर्भात भारतासोबत जवळून काम करण्याच्या संधीची आम्ही वाट पाहत आहोत.

प्राइस पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका समान मूल्ये आणि समान हितसंबंधाना महत्त्व देतो. "भारतासोबत आमची निश्चितच एक व्यापक धोरणात्मक भागीदारी आहे जी आपल्याला अनेक स्तरांवर एकत्रित आणते." आम्ही या महिन्यात संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदेच्या संदर्भात भारत सरकारसोबत खूप जवळून काम करण्यास उत्सुक आहोत.

UNSC
UNSC चे अध्यक्षपद संभाळणारे मोदी भारताचे पहिलेच पंतप्रधान

स्थायी आणि अस्थायी सदस्यांची संख्या किती आहे?

विशेष म्हणजे, सुरक्षा परिषदेच्या दीर्घ-स्थिर सुधारणेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांमध्ये भारत अग्रेसर आहे. ते म्हणतात की, त्यांना संयुक्त राष्ट्रात कायम सदस्य म्हणून स्थान दिले पाहिजे. संयुक्त राष्ट्र महासभेचे पुढील सत्र सप्टेंबरमध्ये होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सध्या पाच कायम आणि 10 अस्थायी सदस्य राज्य आहेत. हे पाच कायम सदस्य रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि अमेरिका आहेत आणि हे देश कोणत्याही ठरावाला व्हेटो करू शकतात. सुरक्षा परिषदेत कायम सदस्यांची संख्या वाढवण्याची मागणी वाढत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com