Climate Change 2023: धक्कादायक! उष्णतेच्या लाटेमुळे 2022 मध्ये युरोपात 15,700 लोकांचा मृत्यू

कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या तीन ग्रीनहाऊस वायूंचे स्तर 2022 मध्ये वाढत गेल्याचे अहवालात म्हटले आहे.
Climate Change Report
Climate Change ReportDainik Gomantak
Published on
Updated on

Climate Change 2023: जागतिक हवामान संघटनेचा (WMO) 2022 चा वार्षिक अहवाल समोर आला आहे. उष्मा, हरितगृह वायूंच्या विक्रमी पातळीमुळे जागतिक स्तरावर दुष्काळ, पूर आणि उष्णतेची लाट या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

युरोपात 2022 मध्ये किमान 15,700 मृत्यू उष्णतेच्या लाटेमुळे झालेत. अशी माहिती या अहवालातून समोर आलीय.

विशिष्ट ठिकाणांवरील रिअल-टाइम डेटानुसार, कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या तीन ग्रीनहाऊस वायूंचे स्तर 2022 मध्ये वाढत गेल्याचे अहवालात म्हटले आहे.

दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांमुळे भारत आणि इतर खंड प्रभावित होतात, त्यामुळे त्यावर अनेक अब्ज डॉलर्स खर्च होतात, असे अहवालात म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांत जागतिक सरासरी तापमानात विक्रमी वाढ झाली आहे; 2022 मध्ये, ते 1850-1900 च्या सरासरीपेक्षा 1.15 अंश सेल्सिअस जास्त नोंदविण्यात आले आहे.

2022 वर्षात पूर्व आफ्रिकेत सततचा दुष्काळ, पाकिस्तानमधील विक्रमी पाऊस आणि चीन आणि युरोपमधील विक्रमी उष्णतेच्या लाटांचा लाखो लोकांवर परिणाम झाला. त्यामुळे अन्नाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

Climate Change Report
Goa SCO Meet: आठ वर्षांनंतर पाकिस्तानी नेता येतोय भारतात, 1999 च्या मुशर्रफ दौऱ्याची म्हणून होतेय चर्चा

"भारत आणि पाकिस्तानमध्ये 2022 च्या मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेच्या लाटेमुळे पीक उत्पादनात घट झाली. युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर भारतातील गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणि तांदूळ निर्यातीवरील निर्बंध यांमुळे अन्न उपलब्धता धोक्यात आली आहे, आंतरराष्ट्रीय अन्न बाजारपेठेतील मुख्य खाद्यपदार्थांमध्ये प्रवेश आणि स्थिरता आणि आधीच मुख्य खाद्यपदार्थांच्या कमतरतेमुळे प्रभावित झालेल्या देशांसाठी जोखीम निर्माण झाली आहे," असे WMO अहवालात म्हटले आहे.

युरोपने असंख्य उष्णतेच्या लाटा अनुभवल्या आहेत, प्रत्येक महिन्यात लक्षणीय उष्णतेच्या लाटा येतात. उन्हाळ्यात, स्पेनमध्ये सुमारे 4,600, जर्मनी मध्ये 4,500, यूकेमध्ये 65 आणि त्याहून अधिक वयोगटातील 2,800, फ्रान्समध्ये 2,800 आणि पोर्तुगालमध्ये 1,000 लोकांचा मृत्यू उष्णतेमुळे झाला. असे अहवालात म्हटले आहे. सर्वात अपवादात्मक उष्णतेची लाट जुलै 2022 च्या मध्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com