Pakistan: पब्जीच्या व्यसनातून अल्पवयीन तरुणाने संपूर्ण कुटुंबाची केली हत्या

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका 14 वर्षीय किशोरवयीन मुलाने आई आणि दोन अल्पवयीन बहिणींसह संपूर्ण कुटुंबाची गोळ्या झाडून हत्या केली.
Gun
GunDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका 14 वर्षीय किशोरवयीन मुलाने आई आणि दोन अल्पवयीन बहिणींसह संपूर्ण कुटुंबाची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, अल्पवयीन मुलाने ऑनलाइन गेम PUBG च्या प्रभावाखाली येऊन हे धक्कादायक कृत्य केले. ही घटना लाहोरच्या (Lahore) काहना भागातील आहे. जिथे 45 वर्षीय आरोग्य कर्मचारी नाहिद मुबारक (Nahid Mubarak) गेल्या आठवड्यात 22 वर्षीय तैमूर आणि 17 आणि 11 वर्षांच्या मुलींसह मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील एकमेव जिवंत असलेल्या नाहिदच्या किशोरवयीन मुलाने ही हृदयद्रावक घटना घडवून आणली. (Under The Influence Of Pubg The Teenage Boy Murdered The Entire Family)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाला ऑनलाइन गेम PUBG खेळण्याचे व्यसन होते. खेळाच्या प्रभावाखाली आपण आई आणि भावंडांची हत्या केल्याचे त्याने कबूल केले आहे. निवेदनानुसार, बराच वेळ हा गेम खेळल्यामुळे या युवकाला काही मानसिक समस्यांचा सामना करावा लागत होता.

Gun
बगदाद विमानतळ कंपाऊंडवर रॉकेट हल्ला, अमेरिकेच्या एअरबेसलाही करण्यात आले लक्ष्य

आईच्या टोमण्याचा आला राग, कुटुंब झोपेत असतानाच केली हत्या

निवेदनानुसार, नाहिद ही घटस्फोटित महिला होती. ती आपल्या मुलाला अभ्यासात लक्ष देत नाही आणि संपूर्ण वेळ PUBG देत असल्यामुळे शिव्या देत असे. ही घटना घडली त्या दिवशी नाहिदने त्याला खडसावले होते. त्यानंतर युवकाने सर्वजण झोपले असताना संपूर्ण कुटुबांची हत्या केली.

लाहोरमधील ही चौथी घटना आहे, 2020 मध्ये पहिली घटना नोंदवली गेली होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाहोरमधील ऑनलाइन गेमशी संबंधित अशी ही चौथी घटना आहे. 2020 मध्ये अशी पहिली घटना समोर आल्यानंतर, लाखो किशोरवयीन मुलांचे जीवन, वेळ आणि भविष्याचे रक्षण करण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली होती. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रोगांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणामध्ये 'गेमिंग डिसऑर्डर' चाही समावेश केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com