युक्रेनियन बंडखोरांनी हल्ल्याच्या भीतीने लष्करी जमाव करण्याचे दिले आदेश

प्रदेशातील वाढती अस्थिरता लक्षात घेता, पूर्व युक्रेनचे फुटीरतावादी नेते आणि रशिया समर्थक डेनिस पुशिलिन यांनी सर्व नागरिकांना रशियात पाठवण्याचे आवाहन केले होते.
Russia-Ukraine Conflict Latest News Update
Russia-Ukraine Conflict Latest News UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पूर्व युक्रेनमधील फुटीरतावादी नेत्याने आक्रमकतेच्या वाढत्या भीतीने संपूर्ण लष्करी जमवाजमव करण्याचे आदेश दिले आहेत. डोनेस्तक प्रदेशातील रशियन-समर्थित फुटीरतावादी सरकारचे प्रमुख डेनिस पुशिलिन यांनी शनिवारी एक निवेदन जारी करून संपूर्ण लष्करी जमावची घोषणा केली आणि राखीव दलाच्या सदस्यांना लष्करी नोंदणी कार्यालयात येण्याचे आवाहन केले. (Russia-Ukraine Conflict Latest News Update)

युक्रेनियन (Ukraine) सैन्य आणि रशियन समर्थित बंडखोर यांच्यात अलीकडच्या काही दिवसांत या प्रदेशात हिंसाचार भडकल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाश्चात्य देशांनी या हिंसाचाराबद्दल भीती व्यक्त केली आहे की मॉस्को त्याच्या नावाखाली हल्ला करू शकतो. डोनेस्तक आणि लुहान्स्कमधील फुटीरतावादी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महिला, मुले आणि वृद्धांना शेजारच्या रशियात पाठवण्याची घोषणा केली.

Russia-Ukraine Conflict Latest News Update
प्यार की धून! ब्रिटीश महिला अधिकारी झाली भारताची सून

बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या भागात अनेक स्फोट झाले.

या प्रयत्नांनंतर लगेचच बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात अनेक स्फोट झाले. पूर्व युक्रेनमध्ये 2014 मध्ये फुटीरतावादी संघर्ष सुरू झाला आणि 14,000 हून अधिक लोक मारले गेले. यापूर्वी, या प्रदेशातील वाढती अस्थिरता लक्षात घेता, पूर्व युक्रेनचे फुटीरतावादी नेते आणि रशिया समर्थक डेनिस पुशिलिन यांनी सर्व सामान्य नागरिकांना रशियात पाठवण्याचे बोलले होते.

डोनेस्तक पीपल्स रिपब्लिकचे प्रमुख डेनिस पुशिलिन म्हणाले होते की आज देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग एकत्रितपणे रशियामध्ये स्थलांतरित होईल. आम्ही प्रथम महिला, लहान मुले आणि वृद्धांना येथून बाहेर काढू.

डेनिसने हल्ल्याची भीती व्यक्त केली

डेनिसने टेलिग्रामद्वारे व्हिडिओ संदेशात कीववर रशियन समर्थक प्रदेशांवर हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप केला. पुशुलिन यांनी भीती व्यक्त केली की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की नजीकच्या भविष्यात सैन्याला आमच्या विरुद्ध आक्रमक होण्याचा आदेश देतील.

हे प्रकरण अणुयुद्धापर्यंत पोहोचले आहे

विशेष म्हणजे युक्रेनबाबत रशिया आणि अमेरिका यांच्यातील चर्चा एवढी वाढली आहे की परिस्थिती अणुयुद्धापर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेने युरोपमध्ये आण्विक-सक्षम B-52 बॉम्बर विमाने तैनात केली आहेत आणि आपले सर्वात प्रगत स्टेल्थ फायटर जेट, F-35 देखील पाठवले आहेत. दुसरीकडे, रशिया उद्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत आजवरचा सर्वात मोठा अण्वस्त्र क्षेपणास्त्र सराव करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com