Ukraine Russia War: सोशल मिडीयावरील जाहिराती तात्पुरत्या बंद

महत्वाची सार्वजनिक सुरक्षा माहिती सुनिश्चित करण्यासाठी आम्ही युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील जाहिराती तात्पुरते अवरोधित करत आहोत,"
Ukraine Russia War Twitter Announced Temporarily Closed
Ukraine Russia War Twitter Announced Temporarily ClosedDainik Gomantak

युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. सोशल मीडिया ट्विटरने म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेनमधील जाहिराती प्रसारीत करण्याचे तात्पुरते थांबवत आहोत. कारण सार्वजनिक सुरक्षा माहिती त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्राधान्य दिलेली आहे. "महत्वाची सार्वजनिक सुरक्षा माहिती सुनिश्चित करण्यासाठी आम्ही युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील जाहिराती तात्पुरते अवरोधित करत आहोत," कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.

Ukraine Russia War Twitter Announced Temporarily Closed
रशियन प्लॅन्सवर युक्रेनियन सैनिकाने फेरले पाणी, लष्कर म्हणतयं 'हीरो'

फेसबुकवरही बंदी

युक्रेनवर रशियाच्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने (Facebook) अलीकडेच क्रेमलिन समर्थित मीडिया ब्लॉक केला आहे. आता रशियाने फेसबुकवर अंशत: बंदी लादून बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही बंदी शुक्रवारी लगेच लागू झाली.

रशियन (Russia) मीडियाच्या सुरक्षेचा विचार करून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रशियाचे परराष्ट्र मंत्रालय आणि अभियोजक जनरलच्या कार्यालयाला फेसबुक मूलभूत मानवी हक्क आणि स्वातंत्र्य तसेच रशियन नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले. त्याच वेळी, रशियाच्या संप्रेषण विभागाने सांगितले की फेसबुकने राज्य वृत्त संस्था (RIA) नोवोस्ती, राज्य टीव्ही चॅनेल झ्वेझदा, प्रो-क्रेमलिन न्यूज साइट्स Lenta.ru आणि Gazeta.ru वरील निर्बंध उठवले आहेत.

रशियन हल्ल्यात 198 लोकांचा मृत्यू

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात 198 लोकांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत असा दावा युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. आरोग्य मंत्री व्हिक्टर ल्याश्को यांनी शनिवारी सांगितले की मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. मात्र, मृतांमध्ये जवान आणि नागरिकांचा समावेश आहे की नाही हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले नाही.

ते म्हणाले की, गुरुवारी झालेल्या प्रचंड हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमध्ये उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडून 33 मुलांसह 1115 लोक जखमी झाले आहेत. त्याचवेळी रशियाच्या लष्कराने युक्रेनमधील लष्करी तळांवर क्रूझ (Cruse) क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी शनिवारी सांगितले की, लष्कराने लांब पल्ल्याच्या कालिब्र क्रूझ क्षेपणास्त्रांनी अनेक युक्रेनियन लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला केला.

गुरुवारी रशियाच्या हल्ल्याला सुरुवात झाल्यापासून लष्कराने युक्रेनमधील 14 हवाई तळ आणि 19 लष्करी कमांड सेंटरसह 821 लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. यासोबतच 24 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा, 48 रडार, सात युद्ध विमाने, सात हेलिकॉप्टर, नऊ ड्रोन, 87 टँक आणि आठ लष्करी जहाजे नष्ट करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com