युक्रेनला क्षेपणास्त्रे दिल्यास पुन्हा हल्ले करू - व्लादिमीर पुतीन

'रशिया सर्वकाही जाळून नष्ट करण्याची तयारी करत आहे - वोलोडिमिर झेलेन्स्की
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला सुमारे 100 दिवस झाले आहेत. तरी ही या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरुच आहे. हे युद्ध थांबावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका सारखे बलाढ्य देश आपली ताकद एकवटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र युद्धस्थिती जैसे थे आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिल्यास तर नवीन लक्ष्यांवर हल्ला करू असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. ( Ukraine-Russia war continues after 100 days )

यावेळी बोलताना पुतीन म्हणाले की, युक्रेनला क्षेपणास्त्रे पुरवणे म्हणजे संघर्ष लांबवणे. तसे झाल्यास त्या लक्ष्यांना लक्ष्य केले जाईल जे आधी लक्ष्य केले गेले नव्हते. याबाबत युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने दावा केला आहे की आतापर्यंत आम्ही रशियन सैन्याचे 31 हजार सैनिक मारले आहेत. हा आकडा युद्धाच्या सुरुवातीपासूनचा म्हणजेच २४ फेब्रुवारी ते ३ जूनपर्यंतचा आहे.

Vladimir Putin
'सर्व धर्मांचा आदर', भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरील वाद आता UN मध्ये

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी 5 जून रोजी देशवासियांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात झेलेन्स्की म्हणाले की ते सर्वकाही जाळून नष्ट करण्याची तयारी करत आहेत. ते धार्मिक स्थळांनाही लक्ष्य करत आहेत. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 113 चर्च उद्ध्वस्त झाल्या आहेत. यातील अनेक चर्च दुसऱ्या महायुद्धातही टिकून होते.

Vladimir Putin
अमेरिकेत 2 वर्षाच्या मुलाने वडिलांवर झाडली गोळी, आई बनली आरोपी

व्हिडिओमध्ये झेलेन्स्की यांनी देशवासीय आणि सैनिकांच्या धैर्याचे कौतुक केले.ते म्हणाले की, रशियाने हल्ला केला तेव्हा इतके दिवस आपण शत्रूचा मुकाबला करू शकू, असे कोणीही वाटले नव्हते, परंतु ज्या प्रकारे आपण रशियन सैन्याचा सामना केला, त्यामुळे आज जगभरात आपले कौतुक होत आहे. हल्ल्यादरम्यान जगातील सर्वोच्च नेत्यांनी मला युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला, पण मी माझ्या कुटुंबाला कसे सोडू शकतो. त्यामूळे आता हे युद्ध नेमके किती दिवस चालणार या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे ही नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com