आजाराने ग्रस्त असलेली महिला दिवसाला करते 30 वेळा उलट्या

शस्त्रक्रिया (Surgery) झाल्यानंतर तिला नव्या आयुष्याची आशा आहे. एमिलीने तिच्या फंडरेझर वेबसाइटवर (website) व्यक्त केले की, एक वेळ अशी होती की तिचे वजन फक्त 31 किलो इतके कमी झाले
आजारी असलेली एमिली
आजारी असलेली एमिली Dainik Gomantak

इंग्लंडमधील (England) लीड्स येथील 27 वर्षीय महिला एका दुर्मिळ आजाराने ग्रासली आहे. त्यामुळे तिला खूप वेदना होत आहेत. या महिलेला गॅस्ट्रोपेरेसीसचा त्रास आहे. हा आजार एक भयानक आहे, यामध्ये तब्ब्ल 30 वेळा दिवसातून उलट्या होतात.

एमिली वेबस्टरने याबद्दल सांगितले आहे की, 2016 मध्ये ती आजारी पडली होती. त्यांनतर तिच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम झाला. लीड्सलाइव्हच्या मते, ही महिला गेल्या पाच वर्षांपासून या आजाराने (Illness) त्रस्त झाली आहे.

एमिलीने सांगितली की, डॉक्टरांनी (Doctor) सुरुवातीला तिला सांगितले की ती IBS नावाच्या सामान्य रोगाने ग्रस्त आहे. परंतु नंतर असे दिसून आले की हा एक मोठा आजरा आहे.

आजारी असलेली एमिली
आजारजन्य चीन...!; कोरोनानंतर आता दुसऱ्या आजाराने पाडले चीनला आजारी

एका अहवालानुसार, UK मधील सुमारे सहा टक्के लोक गॅस्ट्रोपॅरेसिसने ग्रस्त आहेत. या आजारामध्ये सामान्यपणे पोट साफ होत नाही. या महिलेने तिच्या आयुष्यातील बरेच वर्षे रुग्णालयात (hospital) घालवली. यानंतर मात्र आता तिच्यावर या वर्षी शस्त्रक्रिया होणार आहे. तिच्या शस्त्रक्रियेनंतर तिला गॅस्ट्रिक पेसमेकर मिळणार आहे. हे उपकरण तिच्या पचनसंस्थेचे नियमन करेल. तिच्या या शस्त्रक्रियेसाठी तब्बल 9,500 डॉलर इतका खर्च येणार आहे. ज्यासाठी एमिलीने निधी उभारणीचा कार्यक्रम सुरू केला आहे.

एमिलीने सांगितले की, तिला निधी उभारेल असा विश्वास आहे. ही शस्त्रक्रिया येणाऱ्या ख्रिसमससाठी (christmas) तिच्यासाठी खास भेट असेल. तिने सांगितले की, गेल्या काही वर्षांत तिने तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण गमावले आहेत. ती कुटुंबासोबत ख्रिसमस साजरी करू शकली नाही. तिच्या जिवलग मित्राच्या लग्नात ही सहभागी होऊ शकली.

याचं तिला खूप दु:ख आहे. पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला नव्या आयुष्याची आशा आहे. एमिलीने तिच्या फंडरेझर वेबसाइटवर व्यक्त केले की, एक वेळ अशी होती की तिचे वजन फक्त 31 किलो इतके कमी झाले होत, जे सहसा 10 वर्षांच्या मुलीचे वजन असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com