England मध्ये हिंदू-मुस्लिम तणाव! लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरला जमाव

Hindus And Muslims: इंग्लंडमधील लीसेस्टरमध्ये पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झाला.
England
EnglandDainik Gomantak
Published on
Updated on

Hindus And Muslims: इंग्लंडमधील लीसेस्टरमध्ये पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव वाढला आहे. शनिवारी आणि रविवारी पहाटे शहरात चकमक सुरु झाल्याने पोलिसांनी दोन्ही धर्मातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावरील अहवालात दावा करण्यात आला आहे की, या आठवड्याच्या शेवटी विरोध वाढला. व्हिडीओ फुटेजमध्ये पोलिस जमावाला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसरीकडे, जमावाकडून काचेच्या बाटल्या फेकल्या गेल्या. तर काही लोक लाठ्या-काठ्या घेऊन जाताना दिसले.

दरम्यान, लीसेस्टर पोलिसांचे चीफ कॉन्स्टेबल रॉब निक्सन यांनी एका व्हिडिओ ट्विटमध्ये म्हटले की, 'शहराच्या काही भागात अराजकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आम्ही हे वातावरण शांत करण्याचा युध्दपातळीवर प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पोलिसांची (Police) अतिरिक्त कुमकही या भागात पाठवण्यात आली आहे. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणत आहोत, अतिरिक्त पोलिस अधिकारीही तिथे पोहोचत आहेत. आम्ही सातत्याने शांततेचे आवाहन करत आहोत.'

England
Queen Elizabeth II Funeral: महाराणी एलिझाबेथ यांच्यावर आज अंत्यसंस्कार, अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख लावणार हजेरी

हल्लेखोर काळ्या मास्कमध्ये होते: प्रत्यक्षदर्शी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हल्लेखोरांनी काळे मास्क घातले होते. त्यांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी हुडीही घातली होती. फुटबॉलचा सामना बघून एक जमाव परतला होता. तर दुसरीकडे, पोलिसांच्या पथकाने रस्त्यावर बॅरिकेडिंग लावले होते. जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला.

2 आरोपी पोलीस कोठडीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात लोकांचा शोध घेण्यात येत असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकावर हिंसक कट रचल्याचा संशय आहे. तर दुसऱ्यावर घातक शस्रे बाळगल्याचा आरोप आहे. लीसेस्टर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले की, “हिंसक घटनेसंबंधी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. लीसेस्टरमधील मेल्टन रोडवरील एका धार्मिक इमारतीबाहेर एक व्यक्ती ध्वज घेऊन फिरताना आम्हाला दिसला.''

England
Queen Elizabeth II Funeral : राणी एलिझाबेथ यांच्यावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन तणावाला सुरुवात झाली

28 ऑगस्ट रोजी दुबईत भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हे पाहता पोलिसांनी या महिन्याच्या सुरुवातीलाही तसे आदेश दिले होते. शुक्रवारी, चीफ कॉन्स्टेबल निक्सन म्हणाले की, 'पूर्व लीसेस्टर भागात पोलिसांच्या कारवाईचा भाग म्हणून एकूण 27 जणांना अटक करण्यात आली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com