ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांचा अखेर राजीनामा. 'ही' चूक पडली महागात

काहीदिवसांपूर्वी मॅट हॅनकॉक आणि त्याची प्रेमिका गीना कोल्डगेजेलो यांची एक फोट समोर अली होती
Mat Hancock
Mat HancockDainik Gomantak

कोरोना काळात ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी आपल्या सहकारी जीना कोल्डानजेलोचे चुंबन घेणे महागात पडले आहे. या त्यांच्या कृत्यामळे होणाऱ्या टीकेमुळे त्यांना अखेर आपल्या आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याचा आरोप करत लोकांकडून त्यांना पद सोडण्याची मागणी केल्यावर अखेर रविवारी हॅनकक यांनी राजीनामा दिला आहे .

' कोरोना या रोगाने सामान्य लोकांनी बलिदान दिले असून , जर आपण काही चुकीचे केलेअसेल तर प्रामाणिक राहणे ही आपली जबाबदारी बनते.' आशा आशयाचा राजीनामा त्यांनी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याकडे सोपवला आहे.

Mat Hancock
Jammu and Kashmir: जम्मू विमानतळ परिसराजवळ स्फोट, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक दाखल

ब्रिटनच्या एका वेबसाईटच्या वृत्तानुसार 42 वर्षीय हॅनकॉकन यांचा विवाह 15 वर्षांपूर्वी मार्था नामक महिलेसोबत झाला होता, त्यांना तीन मुले देखील आहेत. त्याचबरोबर ज्या महिला सहकार्यासोबत त्यांच्या अफेयर्सची चर्चा होत आहे ती महिला सुद्धा विवाहित असल्याची माहिती मिळत आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये या दोघांची भेट झाली होती.

त्याचबरोबर जीना कोलादानगेलो यांनीही आरोग्य मंत्रालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये कोलागांडेल्लो यांची मंत्रालयात कार्यकारी संचालकपदावरनियुक्ती करण्यात अली होती. हॅनकॉक आणि कोलागंडेल्लो हे त्यांच्या विद्यापीठाच्या काळापासून मित्र आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या वेळी विरोधकांनी मंत्री हॅन्कोक यांच्यावर त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप केला होता.

काहीदिवसांपूर्वी मॅट हॅनकॉक आणि त्याची प्रेमिका गीना कोल्डगेजेलो यांची एक फोट समोर अली होती, ज्यामध्ये दोघे एकमेकांना चुंबन घेत आहेत असं दिसत होत. हे चित्र व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला होता तसच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत होती. परंतु हॅनककन यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि कोरोना प्रोटोकॉल तोडल्याबद्दल माफी मागितली होती पण आता लोकांचा वाढता संताप पाहता अखेर तयांनी आपल्या आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com