nirav 1.jpg
nirav 1.jpg

ब्रिटन न्यायालयाचा मोठा निर्णय; नीरव मोदीची लवकरच घरवापसी

मनी लॉंड्रिंग (Money laundering) आणि पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank) घोटाळा प्रकरणामधील फरार हिरा व्यापारी नीरव मोदीला (Nirav Modi) ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने (High Court of Britain) मोठा झटका दिला आहे. भारत (india) प्रत्यार्पणाच्या विरोधातील त्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने या याचिकेला कोणत्याही प्रकारचा आधार नसल्याचे सांगत हा निर्णय दिला आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संगमनमत करुन 14 हजार कोटींचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी सीबीआय (CBI) आणि सक्तवसुली संचालनायलयाने नीरव मोदीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

नीरव याच्या विरोधातील खटल्याची भारतीय न्यायालयांत नि:पक्षपाती सुनावणी होणार नाही, हा दावाही ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळला होता. तसेच नीरव याच्या वैद्यकीय गरजांची पूर्तता भारतात करण्यात येणार नाहीत, हा दावाही न्यायालयाने अमान्य केला होता. या प्रकरणात प्रथमदर्शनी नीरव मोदी याच्या विरोधात पुरावे दिसत असल्याचेही न्या. गुझी यांनी स्पष्ट केले होते.  (UK court ruling Nirav Modi to return home soon)

भारतीय न्यायालयामध्ये नीरव मोदीच्या विरोधातील सुनावणी नि: पक्षपाती होणार नाही, हा दावाही ब्रिटनमधील न्यायालयाने फेटाळून लावला होता. तसेच नीरव मोदी याच्या वैद्यकीय गरजांची पूर्तता भारतामध्ये करण्यात येणार नाही, हा दावाही ब्रिटनच्या न्यायालयाने अमान्य केला आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी नीरव मोदीच्या विरोधातील पुरावे दिसत असल्याचेही यावेळी न्यायमूर्ती. गुझी यांनी स्पष्ट केले होते. ब्रिटन प्रत्यार्पण कायदा 2003 नुसार न्यायमूर्ती. गुझी यांनी आपला अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवला आहे. अखेर गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली असल्याचे ब्रीटनमधील राजनैतीक अधिकाऱ्यांशी सांगितले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी (Scotland Yard police) नीरव मोदीला 13 2019 रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वॉण्डस्वर्थमधील तुरुंगात आहे.

31 जानेवारी 2018 रोजी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बॅंकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह अन्य काही जणांविरुध्द गुन्हा नोंदविला होता. आरोपींनी संगनमत करुन कटस रचला होता. आणि सार्वजनिक क्षेत्रातील या बॅंकेची फसवणूक केली, अशी तक्रार बॅंकेने नोंदविली होती. मेहुल चोक्सीने सुध्दा अशीच फसवणूक केल्याचे उजेडात आल्यानंतर बॅंकेची 14 हजार कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com