लंडन कोर्टाचा फरार नीरव मोदीला मोठा दणका! 'बँक ऑफ इंडिया'ला 100 कोटी देण्याचे आदेश; न्यायाधीशांनी फेटाळले सगळे बहाणे

Nirav Modi 100 Crore Fine London Court: ब्रिटनमधील एका न्यायालयाने नीरव मोदीला मोठा दणका दिला असून, त्याला 'बँक ऑफ इंडिया'ला तब्बल 10.7 दशलक्ष डॉलर्स (म्हणजेच सुमारे 100 कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत.
Nirav Modi 100 Crore Fine London Court
Nirav ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

UK Court Order Nirav Modi Bank Of India: भारतातून हजारो कोटी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ब्रिटनमधील एका न्यायालयाने नीरव मोदीला मोठा दणका दिला असून, त्याला 'बँक ऑफ इंडिया'ला तब्बल 10.7 दशलक्ष डॉलर्स (म्हणजेच सुमारे 100 कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत. लंडनच्या सर्किट कमर्शियल कोर्टाचे न्यायाधीश सायमन टिंकलर यांनी बँकेचा हा दावा पूर्णपणे कायदेशीर आणि वैध मानला. नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात बंद असून, भारतात होणारे त्याचे प्रत्यार्पण रोखण्यासाठी तो वेगवेगळ्या कायदेशीर क्लृप्त्या शोधत आहे, मात्र या नवीन निर्णयामुळे त्याची कोंडी झाली.

हे संपूर्ण प्रकरण 2012 मधील असून, त्यावेळी बँक ऑफ इंडियाने नीरव मोदीच्या दुबईतील 'डायमंड FZE' या कंपनीला मोठे कर्ज दिले होते. ऑगस्ट 2013 मध्ये नीरव मोदीने स्वतः या कर्जासाठी वैयक्तिक जामीनदार म्हणून स्वाक्षरी केली होती. म्हणजेच कंपनीने पैसे न भरल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नीरव मोदीवर होती. न्यायालयाने नीरव मोदीने बँकेचे नियम आपल्याला लागू होत नाहीत आणि बँकेने कधी पैशांची योग्य मागणीच केली नाही, असा अजब युक्तिवाद केला. मात्र, न्यायमूर्तींनी त्याचे सर्व बहाणे फेटाळून लावत स्पष्ट केले की, वैयक्तिक हमीनुसार नीरव मोदी बँकेची मूळ रक्कम 4.1 दशलक्ष डॉलर्स आणि त्यावरील मोठा व्याज भरण्यास पूर्णपणे जबाबदार आहे.

Nirav Modi 100 Crore Fine London Court
Nirav Modi: नीरव मोदीला मोठा झटका, लंडनमधील आलिशान बंगला विक्रीस; कोर्टाने निश्चित केली किंमत

55 वर्षीय नीरव मोदीला 19 मार्च 2019 रोजी लंडनमध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे. भारत सरकार त्याला मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नीरव मोदीने भारतीय तुरुंगात छळ केला जातो, असा दावा करत प्रत्यार्पणाच्या आदेशाला आव्हान देण्याचा नवा पवित्रा घेतला होता. मात्र, यूके उच्च न्यायालयाने भारत सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत त्याची याचिका फेटाळून लावली.

Nirav Modi 100 Crore Fine London Court
Nirav Modi: 13,500 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात फरार नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, भारत सरकार सर्व फरार गुन्हेगारांना देशाच्या कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 13000 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी मुख्य आरोपी आहेत. सीबीआयच्या मते, यातील सुमारे6498 कोटी रुपयांची हेराफेरी एकट्या नीरव मोदीने (Nirav Modi) केली. लंडन न्यायालयाच्या या 100 कोटींच्या ताज्या दणक्यामुळे फरार नीरव मोदीची रात्रीची झोप उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Diwali Gift For Indian Railways Employees
Narendra Modi 25 years in government
Modi Cabinet Reshuffle 2026
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com