बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना दिली एका महिन्याची पगारी सुट्टी, जाणून घ्या कारण

प्रत्येकाला अशा कंपनीत काम करायचे असते, जिथे त्याला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. पगार वेळेवर मिळणे, सुटीच्या काळात कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसणं.
Office
OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

प्रत्येकाला अशा कंपनीत काम करायचे असते, जिथे त्याला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. वेळेवर पगार मिळणे, सुटीच्या काळात कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसणं. तथापि, अशा अनेक कंपन्या आहेत, जिथे कर्मचाऱ्यांना अशा सुविधा उपलब्ध आहेत. नुकतीच एक कंपनी चर्चेत आहे, जिथे कर्मचाऱ्यांना एक महिन्याची रजा देण्यात आली होती. मात्र, त्याकाळात त्यांचा पगार कापला गेला नव्हता, म्हणजेच त्यांना पूर्ण महिन्याचा पगार देण्यात आला होता.

दरम्यान, हे प्रकरण ब्रिटनमधील आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, ज्या कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याची सुट्टी दिली आणि पूर्ण महिन्याचा पगारही दिला, तिचे नाव 64 मिलियन आर्टिस्ट्स आहे. कर्मचाऱ्यांना हा दिलासा देण्याचा निर्णय कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जो हंटर यांनी घेतला होता. प्रोडक्टिविटी वाढवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. बॉसने आपल्या कर्मचार्‍यांना चांगल्या सुविधा प्रदान केल्या, त्यांना हवं ते दिलं. त्याबदल्यात कर्मचाऱ्यांनीही अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा विश्वास दिला.

Office
America: अमेरिकन विद्यार्थ्यांना आता शिख धर्माचे धडे, सोशल स्टडीज् मध्ये केला समावेश

कोविड काळात कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळाली

विशेष म्हणजे, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कोरोना महामारीच्या काळात या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करण्याची सुविधाही दिली होती. कंपनीच्या सीईओचे म्हणणे आहे की, ऑगस्ट महिन्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक घट नोंदवली गेली नाही, त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

Office
Jill Biden: अमेरीकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांना कोरोना, राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा भारत दौरा धोक्यात

लोकांना कंपनी आवडते

सीईओ जो हंटर म्हणाले की, जेव्हापासून लोकांना आमच्या कंपनीच्या या सुविधेबद्दल माहिती मिळाली आहे, तेव्हापासून लोक येथे काम करण्यास उत्सुक आहेत. जर आम्ही नोकरीसाठी रिक्त जागा असल्याचे आवेदन दिले तर त्यासाठी शेकडो लोकांकडून अर्ज येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com