UK Bans TikTok: ब्रिटिश सरकारने चीनला दिला मोठा दणका, टिकटॉकवर घातली बंदी!

UK Bans TikTok On Government Devices: ब्रिटनचे कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांनी त्यांच्या देशाच्या संसदेत ही बंदी जाहीर केली आहे.
UK Bans TikTok
UK Bans TikTokDainik Gomantak
Published on
Updated on

TikTok Facing Ban On UK Govt Devices: ब्रिटनच्या सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन, ब्रिटिश सरकारने अधिकृत सरकारी फोनवर चिनी व्हिडिओ ॲप 'टिकटॉक' वापरण्यावर बंदी घातली आहे.

ब्रिटनचे कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांनी त्यांच्या देशाच्या संसदेत ही बंदी जाहीर केली आहे. अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियन (EU) आणि भारत यांनी आधीच त्यांच्या देशांमध्ये टिकटॉकवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

चिनी कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत

मात्र, या TikTok ॲपची मालकी असलेल्या चिनी कंपनीने युजर्सचा डेटा चीन (China) सरकारसोबत शेअर केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

गुरुवारी चीनने अमेरिकेवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, बायडन प्रशासन त्यांच्या चिनी मालकांना लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग ॲपमधील त्यांचे स्टेक विकण्यास सांगत आहे.

दरम्यान, टिकटॉकद्वारे सरकारी डेटा आणि माहितीचा कसा वापर केला जातो, त्यात असा धोका असण्याची शक्यता असल्याचे डाउडेन यांनी खासदारांना सांगितले.

UK Bans TikTok
Rishi Sunak भडकले, PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरुन ब्रिटिश संसदेत गदारोळ

सरकारी माहितीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय

ते म्हणाले, 'संवेदनशील सरकारी माहितीच्या सुरक्षेला प्राधान्य आहे, म्हणून आज आम्ही या ॲपवर सरकारी उपकरणांवर बंदी घालत आहोत.' सायबर सुरक्षा तज्ञांच्या सल्ल्यानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचेही मंत्री म्हणाले. हे निर्बंध वैयक्तिक फोन आणि उपकरणांवर लागू होत नाही.

UK Bans TikTok
Rishi Sunak Latest News: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खास संदेश देत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

यापूर्वी, यूएस सरकारने गेल्या महिन्यात आदेश दिले होते की, फेडरल एजन्सीच्या कर्मचार्‍यांना सरकारने जारी केलेल्या सर्व मोबाइल डिव्हाइसवरुन TikTok काढून टाकावे लागेल.

यूएस संसद, व्हाईट हाऊस, यूएस सशस्त्र सेना आणि अमेरिकेच्या अर्ध्याहून अधिक राज्यांनी या ॲपवर आधीच बंदी घातली होती.

युरोपियन युनियन, बेल्जियम (Belgium) आणि इतर अनेक देशांनीही त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोनवरुन ॲपवर तात्पुरती बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com