America Shootout News: अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 2 जणांचा मृत्यू तर 5 जखमी

Shootout in America News: अमिरेकेतील व्हर्जिनियात बेछुट गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
America Shootout News
America Shootout NewsDainik Gomantak
Published on
Updated on

America Firing News: अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात बेछूट गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील विद्यापीठात पदवीदान सोहळा सुरू असतानाच हल्लेखोराने विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

आरोपीने केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 5 जखमी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

आरोपी 19 वर्षीचा असून त्याने गोळीबार का केला, याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या साथीदारांचाही शोध सुरु आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या रिचमंड भागातील मनरो पार्कमध्ये ही घटना घडली आहे. यामुळे अमेरिकेत पुन्हा खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हर्जिनिया विद्यापीठाचा पदवीदान सोहळा अल्ट्रिया थिएटरमध्ये सुरू होता. पास झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येत असतानाच एका व्यक्तीने अचानक सभागृहातच गोळीबार केला.

यात ५ विद्यार्थी जखमी झाले असून २ जागीच ठार झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीने झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी (Police) संपूर्ण परिसर सील केला आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना विद्यापीठ परिसरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

पदवीदान सोहळा गोळीबाराच्या घटनेमुळे रद्द करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात सातत्याने गोळीबार होत असल्याच्या घटना समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com