Tsunami warning in Indian Ocean
Tsunami warning in Indian OceanDainik Gomantak

Tsunami Warning: पूर्व तिमोर किनारपट्टीवर 6.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का,आता हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा

पूर्व तिमोर किनारपट्टीवर शक्तीशाली भूकंपानंतर हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
Published on

पूर्व तिमोर किनारपट्टीवर शक्तीशाली भूकंपानंतर हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपानंतर भारतीय उपमहासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

तिमोर किनारपट्टीवर झालेल्या भूकंप आला असून अद्याप कोणत्याही जिवित आणि वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के अधिक तीव्र क्षमतेचे होते. पूर्व तिमोरच्या जीएमएन टीव्हीचे माहिती संचालक फ्रान्सेझ सुनी यांनी राॅयटर्स वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले, भूंकपाचे धक्के अधिक तीव्र क्षमतेचे होते. भूकंपाच्या धक्क्यांनी (Earth Quake) इमारतीमध्ये हादरे बसू लागल्याने आमचे सहकारी बाहेर पळाल्याचे ते म्हणाले.

या भूकंपाच्या धक्क्यानंतर आता हिंद महासागर त्सुनामी इशारा आणि शमन प्रणाली (IOTWMS) त्सुनामीचा इशारा दिला आहे. परंतु, युरोपीय-भूमध्य भूकंपविज्ञान केंद्राने (EMSC) त्सुनामीची शक्यता नाकारली आहे.

Tsunami warning in Indian Ocean
नेपाळ: भारतीय दूतावासाने मुस्तांगमधील शाळेच्या सुधारित पायाभूत सुविधांचे केले उद्घाटन

इएमएससीने अधिक माहिती देताना सांगितले, भूकंप 10 किमी खोलवर होता आणि त्याचे धक्के 29 किमी दूर लासपालोसपर्यंत जाणवले. अमेरिकेच्या (America) भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपाची तीव्रता 50 किमी दूर 6.1 रिश्टर स्केल असल्याचे सांगितले आहे.

इंडोनेशियाबरोबरच पूर्व तिमोर पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” वर बसले आहे. जे सहसा आग्नेय आशिया आणि पॅसिफिक खोऱ्यात पसरलेली तीव्र भूकंपाची क्रिया घडवून आणते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियामध्येही डार्विन शहराच्या 700 किमी दूर भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com