"पाकिस्तानमधील 80 टक्के लोक 'GAY' आहेत"; ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या हिना बलोच यांचा खळबळजनक दावा Watch Video

Hina Baloch Pakistan gay claim: पाकिस्तानमधील सामाजिक आणि लैंगिक विषमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या हिना बलोच सध्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत.
Hina Baloch Pakistan gay claim
Hina Baloch Pakistan gay claimDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमधील सामाजिक आणि लैंगिक विषमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या हिना बलोच सध्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. 'क्वीर ग्लोबल' या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानच्या कट्टरतावादी समाजाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला आहे. हिना यांनी असा दावा केला आहे की, पाकिस्तानची जवळपास ८० टक्के लोकसंख्या समलिंगी (Gay) आहे, तर उर्वरित २० टक्के लोक उभयलिंगी (Bisexual) आहेत. हा तिथल्या समाजाचा एक 'ओपन सीक्रेट' असून लोक केवळ भीतीपोटी आपली ओळख लपवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सामाजिक दडपण आणि दुहेरी आयुष्य

हिना बलोच यांच्या मते, पाकिस्तानमध्ये धर्म, संस्कृती आणि कुटुंबाची प्रतिष्ठा या नावाखाली लोकांच्या नैसर्गिक लैंगिक आवडीनिवडी दडपल्या जातात. समाजात स्वतःची प्रतिमा टिकवण्यासाठी अनेकजण 'स्ट्रेट' असल्याचे भासवतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचे वास्तव वेगळे असते. हिना यांनी स्वतःच्या बालपणातील संघर्षाचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांना महिलांचे कपडे घालण्याची किंवा मेकअप करण्याची प्रचंड ओढ होती. मात्र, तसे केल्यास कुटुंबाकडून होणारी मारहाण आणि छळ या भीतीपोटी त्यांना अनेक वर्षे स्वतःची ओळख दाबून ठेवावी लागली.

Hina Baloch Pakistan gay claim
Goa Mankurad Mango: मानकुराद दीड हजार रुपये डझन, बाजारात आवक वाढली; स्थानिक आंब्यांना अधिक मागणी

'ख्वाजा सिरा' समुदायाची दयनीय अवस्था

पाकिस्तानमध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला 'ख्वाजा सिरा' म्हणून ओळखले जाते. या समुदायाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर हिना यांनी कडक शब्दांत टीका केली. त्यांच्या मते, या लोकांना मुख्य प्रवाहातील रोजगाराच्या संधी नाकारल्या जातात. परिणामी, जगण्यासाठी त्यांना भीक मागणे, नाचणे किंवा शरीरविक्रयासारख्या शोषक व्यवसायांकडे वळावे लागते. हिना यांनी ही व्यवस्था बदलण्यासाठी 'सिंध मूरत मार्च' आणि 'औरत मार्च'च्या माध्यमातून आवाज उठवला, परंतु त्यांना व्यवस्थेच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Hina Baloch Pakistan gay claim
Goa Drowning Death: मासेमारीचे जाळे सोडवताना तरुणाचा बुडून मृत्यू, शापोरा नदीत दुर्घटना; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

छळ आणि देशत्यागाची वेळ

मानवी हक्कांसाठी लढत असताना हिना यांना अनेकवेळा धमक्या आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. एका आंदोलनादरम्यान प्राइड फ्लॅग (इंद्रधनुषी झंडा) फडकवल्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानात तीव्र टीका झाली. सुरक्षा यंत्रणांनी त्यांचे अपहरण करून त्यांचा छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अखेर जीवाच्या भीतीपोटी त्यांना देश सोडावा लागला. सध्या हिना बलोच ब्रिटनमध्ये आश्रयाला असून लंडनच्या प्रतिष्ठित विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. मात्र, त्यांच्या या दाव्यामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या सामाजिक संरचनेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com