Ukraine: युक्रेनच्या मोठ्या मंत्री येणार भारत भेटीला, रशियासोबतच्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारत दौरा

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक वर्षांहून अधिककाळ झाला आहे.
Ukraine India
Ukraine IndiaDainik Gomantak

Ukraine India: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक वर्षांहून अधिककाळ झाला आहे. रशिया दिवसेंदिवस युक्रेनवरती हल्ले करत असल्याचा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तर, युक्रेन देखील रशियाला तेवढ्याच क्षमतेने उत्तर देत आहे.

दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संघर्षानंतर पहिल्यांदाच युक्रेनच्या मंत्रिमंडळातील बड्या मंत्री भारताच्या भेटीवर येत आहेत. रशिया भारताचा जवळचा मित्र आहे. दरम्यान, युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे या मंत्र्याच्या भारतील भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

युक्रेनच्या प्रथम परराष्ट्र व्यवहार मंत्री एमिने झापरोवा 9 ते 12 एप्रिल 2023 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. या भेटीदरम्यान झापरोवा परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम), संजय वर्मा यांच्याशी चर्चा करतील.

दोन्ही देशात द्विपक्षीय संबंध, युक्रेनमधील सद्य परिस्थिती आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

झापरोवा परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचीही भेट घेतील आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांचीही भेट घेतील. असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

Ukraine India
गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, सहा दिवसांसाठी मिळेल हिमाचल राज्यात जाण्याची संधी

"भारताचे युक्रेनशी मैत्रीपूर्ण संबंध आणि बहुआयामी सहकार्य नेहमीच राहिले आहे. राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्याच्या 30 वर्षांमध्ये, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्याने व्यापार, शिक्षण, संस्कृती आणि संरक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. परस्पर सामंजस्य आणि हितसंबंधांसाठी युक्रेन मंत्री यांची ही भेट एक महत्त्वाची भेट असेल.” असे भारताच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मागील वर्षी 24 फेब्रुवारीला रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या संघर्षाला सुरूवात झाली. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात युक्रेनहून अठरा पटींनी मोठ्या असलेल्या रशियाने (लोकसंख्या 14 कोटी) चार कोटी लोकसंख्येच्या युक्रेनवर सैनिकी हल्ले चढवून हाहाकार माजविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com