येत्या काळात नवी महामारी देणार दस्तक! टॉप ब्रिटिश शास्त्रज्ञाचा इशारा; डब्ल्यूएचओनेही तयारी केली सुरु

Pandemic: करोना महामारीतून जग काहीसं सावरलं असतानाच ब्रिटिश शास्त्रज्ञाच्या दाव्यानं पुन्हा चिंता वाढवली आहे.
top british scientist warns next pandemic
top british scientist warns next pandemic dainik gomantak
Published on
Updated on

Pandemic: करोना महामारीतून जग काहीसं सावरलं असतानाच ब्रिटिश शास्त्रज्ञाच्या दाव्यानं पुन्हा चिंता वाढवली आहे. येत्या काळात कोरोना महामारीसारखी नवी माहमारी दस्तक देऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. सध्या त्यांच्या दाव्याची जोरदार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेनेही त्यांच्या या दाव्याची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढील महामारीचा सामना करण्यासाठी आधीच तयारी सुरु केली आहे. जागतिक तयारी बळकट करण्याच्या उद्देशाने WHO ने सोमवारी आपल्या वार्षिक बैठकीला सदस्य देशांचे मंत्री आणि इतर शीर्ष प्रतिनिधींसोबत सुरुवात केली.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक व्हॅलेन्स यांनी इशारा दिला की आणखी एक महामारी येणे निश्चित आहे. तत्पूर्वी सरकारने आतापासूनच तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्हॅलेन्स पुढे म्हणाले की, पुढील सरकारने ब्रिटनची आगामी संसदीय निवडणूक लक्षात घेऊन मुख्य मुद्द्यांचा निपटणारा करण्यासाठी तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. व्हॅलेन्स पुढे असेही म्हणाले की, येत्या काळात येणाऱ्या धोक्यांबदल आपण सर्वांनी सजग असले पाहिजे. 2021 मध्ये G7 नेत्यांना दिलेल्या मेसेजचा पुनरुच्चार करुन त्यांनी त्वरित प्रतिसादाच्या महत्त्वावर जोर दिला.

top british scientist warns next pandemic
Hepatitis B and C: 3.5 कोटी भारतीयांना धोका! WHO चा धक्कादायक रिपोर्ट; अशी ओळखा लक्षणे

दरम्यान, त्यांचा इशारा अशा वेळी आला आहे जेव्हा WHO पुढील महामारीसाठी बैठक घेत आहे. तथापि, बैठकीतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे साथीच्या रोगावरील करारावर स्वाक्षरी करणे परंतु मसुद्याच्या अभावामुळे तो रखडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com