अमेरिकन फूड कंपनी हाइंज (Heinz) ने मंगळ ग्रहावरच्या मातीत पिकवलेल्या टोमॅटोपासून प्रसिद्ध केचप तयार केला आहे. मानवाच्या मंगळावर राहण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे संशोधन करण्यात आले आहे. पृथ्वीवर आढळणाऱ्या मातीच्या विपरीत, मंगळावरची माती पिकांसाठी अधिक कठीण आहे. असे या संशोधनातून निष्कर्शास आले.
मंगळाची माती मार्टियन रेगोलिथ म्हणून ओळखली जाते. मंगळावरच्या मातीत सेंद्रिय पदार्थाचे अस्तित्व नाही. याशिवाय मंगळावर कमी सूर्यप्रकाश पोहोचतो. यामुळे टोमॅटो पिकवणाऱ्या संघाला ते वाढवण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करावा लागला.
एक दिवस मंगळावर गेलेल्या मानवाला स्वतःची शेती करता यावी पिकं घेता यावं यासाठी हे प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत या दिशेने काम करणाऱ्या टीमने मंगळ ग्रहासारखे हरितगृह वातावरण तयार केले आणि मंगळावर असते तशीच माती वापरली. त्यांनी या तंत्रज्ञानाच्या मदतीने टोमॅटो वाढवले आणि नंतर हाइंज (Heinz) त्यांचे केचपमध्ये रूपांतर केले.
हे टोमॅटो तयार करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे पिके घेणे कठीण होत आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरही अशा प्रकारे पिके घेता येतात. नासाचे माजी अंतराळवीर माईक मॅसिमिनो म्हणाले की, घरापासून दूर असताना परिचित चव येणे हा प्रत्येकासाठी आनंदाचा आणि मनोबल वाढेल असा क्षण आहे.
हाइंज ने टोमॅटोच्या माध्यमातून नवीन 'मार्स एडिशन' केचप तयार केला आहे. या केचपची चव सामान्य केचपपेक्षा वेगळी असल्याचे त्यात म्हटले आहे. हाइंजने मार्स व्हर्जन केचपची बाटलीही अवकाशात पाठवली, जिथे ही बाटली -94 अंश तापमानात राहिली. त्यानंतर ते पृथ्वीवर परतले.
हाइंजधील टोमॅटो मास्टर्स मंगळावर येणारे भविष्यातील अभ्यागत ग्रहाच्या मातीत टोमॅटो वाढवून केचप बनवू शकतात का हे शोधण्यासाठी एक मोहीम सुरू केली. त्यासाठी उत्तमोत्तम बियाणे घेण्यात आले व जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची वाढ करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.