Titanic: टायटॅनिकचा मोह सुटेना! अमेरिकेचा विरोध झुगारुन 'या' कंपनीचे अवशेष शोधण्यासाठी अभियान

Titanic: उत्तर अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी हे अभियान चालवण्यात येणार आहे.
Titanic Submersible
Titanic SubmersibleDainik Gomantak
Published on
Updated on

Titanic: उत्तर अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाज बुडून अनेक वर्षे पूर्ण झाली तरीही त्याविषयीचे कुतुहल अजूनही लोकांच्या मनात जागे आहे. हे कुतुहल वेळोवेळी अनेक घटनांमधून दिसते.

काही दिवसांपूर्वीच टायटॅनिकच्या शोधात निघालेली पानबुडी बुडून जगातील पाच श्रीमंत व्यक्तींचा मृत्यू झाल्याची भयानक घटना जगासमोर आली होती. मात्र यानंतरदेखील आता पून्हा एकदा टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी आणखी एका कंपनीने टायटॅनिक अभियानाची घोषणा केली आहे.

जॉर्जियामधील आरएमएस टाइटॅनिक इंक नावाच्या कंपनीने ही घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहीतीनुसार, हे अभियान पुढील वर्षी राबवणार आहे. उत्तर अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी हे अभियान चालवण्यात येणार आहे.

Titanic Submersible
स्वर्ग खरंच आहे! साक्षात मृत्यू अनुभवून जीवंत झालेल्या 5000 जणांवर केलेल्या संशोधनानंतर दावा

महत्वाचे म्हणजे, टायटॅनिकच्या अवशेषांना वाचवण्याचा अधिकार या कंपनीकडे आहे. याआधीदेखील कंपनीने या अद्भूतपूर्व जहाजाचे काही अवशेष शोधून वाचवले आहेत. आता पून्हा एकदा टायटॅनिक जहाज वाचवण्यासाठी हे अभियान चालवण्यात येणार आहे.

मात्र कंपनीच्या या अभियानाला अमेरिकेचे सरकार विरोध करत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेचे सरकार टायटॅनिकचे अवशेष कोण काढू शकते, कोण नाही यावर नियंत्रण ठेऊ इच्छित आहे.

अमेरिकेच्या सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वाणिज्य मंत्री आणि त्यांच्या अधिकाराखाली येणाऱ्या मेरीटाइम युनिटजवळ आरएमएस टाइटॅनिक इंक कंपनीला परवानगी द्यायची आहे की नाही याचे कायदेशीर अधिकार आहेत. त्यामुळे अमेरिके( USA )चे सरकार जॉर्जियामधील आरएमएस टाइटॅनिक इंक कंपनीला विरोध करत आहे.

दरम्यान, समर्सिबल पानबुडी टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी समुद्रात उतरली होती. मात्र या पानबुडीचा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्याच्या अधिकारांवर प्रश्न निर्माण होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com