Afghanistan: काबूलमधील शाळेत तीन स्फोट- अहवाल

काबूलमधील (kabul) शाळेत झालेल्या तीन स्फोटात बरेच लोक ठार झाले आहेत.
kabul
kabulDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलमधील एका शाळेत तीन सिरीयल बॉम्बस्फोट झाले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाण सुरक्षा आणि आरोग्य अधिकार्‍यांनी मंगळवारी सांगितले की, 'पश्चिम काबुलमधील (Kabul) एका हायस्कूलमध्ये तीन स्फोट झाले, ज्यात अनेक लोक ठार झाले.' काबुल कमांडरचे प्रवक्ते खालिद झदरन म्हणाले, "तीन स्फोट झाले आहेत... एका हायस्कूलमध्ये, आमच्या शिया लोकांची प्राणहानी झाली आहे."

kabul
Afghanistan: तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार?

खरं तर, इस्लामिक स्टेटसह सुन्नी दहशतवादी गट शिया हजारा समुदायाच्या लोकांना लक्ष्य करत आहेत. त्याचवेळी त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हॉस्पिटलच्या (Hospital) नर्सिंग विभागाच्या प्रमुखांनी नाव सांगण्यास नकार दिला, स्फोटांमध्ये किमान चार लोक ठार आणि 14 जखमी झाले आहेत.

सत्ता तालिबानच्या हातात

अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर तालिबानने सत्ता काबीज केली. ऑगस्टमध्ये सत्ता हाती घेतल्यापासून देशात शांततेचे वातावरण निर्माण झाल्याचे तालिबानकडून (Taliban) सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे की, 'इथे पुन्हा दहशतवाद सुरु होण्याचा धोका आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने अनेक मोठ्या हल्ल्यांचा दावा केला आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com