पाकिस्तानच्या 'या' लष्करी अधिकाऱ्याने भारतात घेतले होते मिलिट्री ट्रेनिंग; जाणून घ्या

भारतामधील मिलिट्री ट्रेनिंग ॲकेडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन भारताच्याच विरोधातील लढाईमध्ये कामगिरी बजावली होती.
 Military Officer
Military OfficerDainik Gomantak
Published on
Updated on

सात दशकापूर्वी हिंदुस्तानचे विभाजन होऊन पाकिस्तान (Pakistan) हा देश अस्तित्वात आला. 14 ऑगस्टला पाकिस्तान आपला स्वतंत्र्यदिन साजरा करतो आणि भारत (India) 15 ऑगस्ट रोजी आपला स्वतंत्र्यदिन साजरा करतो. दोन्ही देशांमध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्यता आढळते. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नागरिकांचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. आज आपण अशा पाकिस्तानी जनरल अधिकऱ्याविषयी जाणून घेणार आहोत, ज्याने भारतामधील मिलिट्री ट्रेनिंग ॲकेडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन भारताच्याच विरोधातील लढाईमध्ये कामगिरी बजावली होती.

IMA मधून जनरल मूसा खान पासआउट

उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनमधील इंडियन मिलिट्री केडमी यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये 90 वर्ष पूर्ण करते. 1931 मध्ये इंडियन मिलिट्री कॉलेज कमेटी चेअरमेन फील्‍ड मार्शल फिलिप चेटवुड होते, त्यांच्यातर्फे ही कडमी स्थापन करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. आणि त्यानंतर 1 अक्‍टोबर 1932 मध्ये अस्तित्वात ही ॲकेडमी आली. आईएमएमधून बाहेर पडलेल्या तीन आर्मी ऑफिसर्संनी आपल्या देशाच्या सैन्यदलांचे नेतृत्व केले.

 Military Officer
Afghanistan War: तालिबान्यांचा कंधारवर कब्जा

एक जवान म्हणून लष्करात भरती

इंडियन आर्मी चीफ फील्‍ड मार्शल सैम मोनेकशॉ, पाकिस्तान आर्मी चीफ जनरल मुहम्मद मूसा (General Musa Khan) आणि म्यानमार आर्मी चीफ जनरल स्मिथ दुन, आईएमएमधून पासआउट झाले. जनरल मुहम्मद मूसा यांनी 1947 आणि 1965 मध्ये कश्मीरमध्ये आतंकवाद च्या नावावर अशांती पसरविण्याचा प्रयत्न केला. जनरल मूसा खान यांचा जन्म 1908 मध्ये क्वेटात झाला. ते पाकिस्तानमधील लोकप्रिय असणाऱ्या हजारा समुदायातून येतात. 1926 मध्ये मूसा यांना ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये एक जवान भरती म्हणून भरती झाले होते. त्यानंतर जनरल मूसा बलुचिस्तानचे (Balochistan) गव्हर्नरही बनले.

 Military Officer
तालिबानी संघटनेनं कब्जा केलेले शहर अफगाणी सैन्यांनी 24 तासात मिळवलं

पाकिस्तानची निर्मिती

ऑक्टोबर 1932 मध्ये जनरल मूसा यांची लष्करामध्ये भरती झाले होते. 1947 मध्ये भारताचं विभाजन झाल्यानंतर ते नव्याने बनलेल्या पाकिस्तानमध्ये गेले. दुसऱ्या महायुध्दामध्ये मूसा यांनी ब्रिटनच्या बाजूने लढाईमध्ये सामील झाले होते. 1947 मध्ये भार त आणि पाकिस्तान यांच्यामधील युध्दभूमी बनलेल्या जम्मू काश्मीर राज्यांवरुन संघर्ष निर्माण झाला. त्या दरम्यान जनरल मूसा हे पाकिस्तान लष्कराचे जनरल कमांड होते. 1958 मध्ये पाकिस्तानमध्ये राजकिय सत्तापालट करत पाकिस्तानी लष्करांनी राजकिय सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यावेळी तत्कालिन पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आयूब खान यांनी जनरल मूसा यांना कमांडर इन चीफ बनवले. 1965 मध्ये जनरल मूसांना प्रसिध्दी मिळाली आणि त्यानंतर त्यांना पाकिस्तान आर्मीचे आर्मी चिफ बनविण्यात आले. 1991 मध्य़े जनरल मूसा यांचा मृत्यू झाला.

 Military Officer
अमेरिकेसोबत संबंध चांगले झाले तर ठिक, अन्यथा पाकिस्तानकडे 'चीनी' पर्याय खुले

बेस्ट मिलिट्री ॲकेडमी

आईएमए मध्ये देशातील सर्वश्रेष्ठ ऑफिसर्सना प्रशिक्षण देण्यात येते. या एकडमीने अनेक बहादूर अधिकारी दिले आहेत. त्यामध्ये मेजर सोमनाथ शर्मा, कैप्‍टन गुरबचन सिंह, लेफ्टिनेंट कर्नल होशियार सिंह, सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल, कैप्‍टन विक्रम बत्रा, कैप्‍टन मनोज पांडे समावेश होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com